कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा कट्टा कॉर्नर येथे दुकानातील पैशाची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोराला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात.

बांदा कट्टा कॉर्नर येथे दुकानातील पैशाची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोराला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात.

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

बांदा येथील कट्टा कॉर्नर येथील दुकानातील पैशाची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोराला स्थानिकांनी पाठलाग करत पकडले.गणेश चतुर्थीचा बाजार नेण्यासाठी
बाजारपेठेत गर्दी असल्यामुळे गर्दीचा फायदा घेत दुकानातील पैशांची पिशवी घेऊन पळणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही घटना आज दुपारी १ वा. सुमारास घडली. दुकानात गर्दीचा फायदा घेत हा चोरटा शिरला.तेथे गल्ल्यावर असलेली पैशांची पिशवी त्याने हातचालाकी करत लांबविली. दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने तेथून एस टी स्टँडच्या दिशेने पलायन केले.तेथे असलेल्या स्थानिकांनी चोरट्याचा पाठलाग केला. शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान,हेमंत दाभोलकर व पायलेटिंग करणाऱ्या युवकांनी त्याला रुक्मिणी सुपर बाजारच्या नजिक पकडले. त्याला चोप दिल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली.याची कल्पना बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!