कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 राजापूराच्या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे..

🟥 कोटींची उड्डाणे करून सुद्धा परिस्थिती पहिल्यापेक्षा वाईट..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि.०८ सप्टेंबर :- सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन राजापूर शहरातील मुख्य रस्त्याचे करण्यात आलेले काम व पावसाळ्यात याच कोटीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे याबाबत नागरिकांमधून ओरड होताच काही दिवसांपुर्वी हे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र पुन्हा पाऊस पडताच आणखीनच खड्डे पडल्याने राजापूर वासियांमधुन सखेद आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.

गेली तीन ते चार वर्षे राजापूर शहरातील मुख्यरस्त्याचा प्रश्न भयंकर जटिल झाला होता. फडणवीस सरकारच्या काळात या मुख्यरस्त्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष जमीर खलीफे यानी एक कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला होता. परंतु त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील कामांच्या मंजुर निधीला स्थगिती दिल्याने हे काम रखडले होते. मात्र पुन्हा प्रयत्न करत तत्कालीन नगराध्यक्ष जमीर खलिफे यानी हा निधी मिळवण्यात यश मिळवले.

निधी आल्यानंतरही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व राजापूरच्या गलिछ राजकारणामुळे पुन्हा हे काम रखडले. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने ठेकेदाराने हे काम पुढे ढकलले. अखेर जानेवारी २०२३ नंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यातही योग्य नियोजना अभावी पुन्हा हे काम रखडले व नागरिकाना धुळीचा सामना करत नरकयातना सहन करत या रस्त्यावरुन प्रवास करावा लागला.

नागरिकांच्या संयमाचा बांध फुटताच संतप्त प्रतिक्रिया उमटु लागताच अखेर या रस्त्याच्या कामाला मुहुर्त मिळाला मात्र ‘काय द्या’ च्या राजकारणाचे गणित पाहता काम निकृष्ट झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. व त्यावर पहिल्याच पावसात शिक्कामोर्तबही झाले. जेमतेम महिनाभर तग धरुन राहीलेला हा रस्ता पावसाळ्यात कुशे मेडिकलच्या समोर गलितगात्र झाला. या खड्डयांवरुन पुन्हा ओरड होताच काही दिवसापुर्वी हे खड्डे भरण्याचे काम (निकृष्ट दर्जाचेच) केले गेले. त्यातच कालपासुन पुन्हा पाऊस सुरु होताच खड्डे भरण्याच्या कामाची लक्तरे उघड झाली व पुन्हा खड्डे आपले अस्तित्व दाखवायला लागले.

दोनच दिवसांपुर्वी भरलेले खड्डे आता आणखीनच मोठे झाले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील वाहतुक वाढणार आहे व त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

राजापूर नगर परिषदेच्या या तकलादु कामामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असुन राजापूरवासियांमधुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . तसेच प्रशासकीय यंत्रणा याबाबत मुग गिळून गप्प का असा सवाल विचारला जात आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!