लाठी हल्ल्याचा बांदा मराठो समाज संघटनेकडून निषेध
लाठी हल्ल्याचा बांदा मराठो समाज संघटनेकडून निषेध
बांदा
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध आज बांदा येथील पिंपळेश्वर मंदिरासमोर बांदा मराठा समाजाने केला. यावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बांदेश्वर भूमिका मंदिर येथून बांदा मराठा समाजातर्फे बाईक रॅली काढण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यासाठी भूमिका देवी मंदिर येथेमंगळवारी सायंकाळी मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती. बैठकीला राजाराम उर्फ बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, स्वप्निल सावंत, साई सावंत, मिलिंद सावंत, परिमल सावंत, सागर सावंत, मकरंद तोरस्कर, राकेश परब, दीपक सावंत, संतोष माजगावकर, सुनील माजगावकर, सचिन आईर, राजाराम सावंत, सर्वेश मुळये, नीलेश पटेकर, जय पटेकर, श्यामसुंदर धुरी, रत्नाकर आगलावे, अवंती पंडित, राखी कळंगुटकर, माधवी गाड, स्वाती सावंत, लक्ष्मी सावंत, प्रथमेश पडवळ, राजू देसाई, बाळू सावंत, म. गो. सावंत आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

