अखेर ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी पडते, पारकर
अखेर ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी पडते, पारकर
कणकवली विधानसभा प्रमुखपदी सतीश सावंत
कणकवली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या यापूर्वी झालेल्या नियुक्त्यांची अंमलबजवणी रखडली होती. त्यानंतर पुढे काय, याबाबत गेले काही महिने चर्चा असताना अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून संजय पडते व संदेश पारकर यांची वर्णी लागली आहे. तर कणकवली विधानसभाप्रमुखपदी सतीश सावंत व कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून अतुल रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाकरे शिवसेनाच्यावतीने काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात तीन विधानसभांसाठी जिल्हाप्रुमख नावे जाहीर काली होती. यात कणकवली विधानसभेसाठी सतीश सावंत, सावंतवाडीसाठी संदेश पारकर तर कुडाळसाठी संजय पडते यांची नावे जाहीर झाली. तर जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून अतुल रावराणे
यांची नियुक्ती झाली होती. मात्र, नियुक्तीनंतर या पदांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती होती..
दोन दिवसांपूर्वी मुंबईत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात कणकवली, देवगड, वैभववाडी व मालवण या चार तालुक्यांसाठी जिल्हाप्रमुख म्हणून संदेश पारकर तर सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ व दोडामार्ग या चार तालुक्यांसाठी जिल्हाप्रमुख म्हणून संजय पडते असणार आहेत. कणकवली विधानसभाप्रमुख म्हणून सतीश सावंत तर कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून अतुल रावराणे यांची नियुक्ती झाली आहे.
कणकवली विधानसभेसाठी संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे हे तिघेही इच्छुक असल्याने आता उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

