कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

नांदगाव येथे सुरेश उर्फ बाळा मोरये यांच्या वाढलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कारवाई करा…

*🟥नांदगाव येथे सुरेश उर्फ बाळा मोरये यांच्या वाढलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कारवाई करा…*

*🟥व्यापारी संघटनेकडून कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची घेतली भेट; कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा  दिला इशारा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴 कणकवली, दि.०६:* नांदगाव तिठा येथील सुरेश उर्फ बाळा मोरये व त्यांचा मुलगा कमलेश मोरये हा गेली काही वर्ष नागरिकांना विनाकारण त्रास देत आहे. काल ग्रामपंचायत मध्ये नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर यांच्या अंगावर जात त्या दोघांनीही धमकी दिली .काही दिवसापूर्वी मेडिकल दुकानदारांना मारहाण केली.गेल्या वर्षी रिक्षा चालकांना शिवीगाळ केली.बॅनर फाडले असे अनेक गुन्हे बाळा मोरये आणि कमलेश मोरये करीत आहेत.यामुळे नांदगाव ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे,संबंधितावर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांना नांदगाव सरपंच भाई मोरजकर,व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे.

तसेच काल बाळा मोरये व त्यांच्या मुलाने अनाधिकृत बांधकाम केलेला सेडचा असेसमेंट देण्याची मागणी केली.त्यावेळी सरपंचांनी नकार दिला,त्यावेळी सरपंचांना धमकी देत अंगावर जाण्याचा प्रयत्न केला.स्वतः विकलेल्या गाळ्या समोर चार दिवसापूर्वी दुकानासमोर किचन चे अनाधिकृत बांधकाम करत दादागिरी केली,असे सातत्याने दादागिरी करत नागरिकांना त्रास देण्याचा काम बाळा मोरये आणि त्यांचा मुलगा करत आहे. त्यामुळे संबंधित दोघांवर कठोर कारवाई करा अन्यथा नांदगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असा इशारा सरपंच भाई मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्यांनी पुन्हा असा प्रकार घडल्यास जबाबदार कोण? अशी विचारणा पोलिसांना केली.

यावेळी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री,रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा कोदे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच इरफान साटविलकर, असलदे गावचे माजी सरपंच तथा  व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर ,उपाध्यक्ष मारुती मोरये, सचिव कमलाकर महाडिक, खजिनदार दाजी सदडेकर , माजी सरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षता खोत,जैबा नावलेकर , विनोद मोरये, नमिता मोरये,यासिन नावलेकर, कमलेश पाटील,भुपेश मोरजकर, आनंद मोरजकर, श्रीराम मोरजकर, आनंद गगनग्रास, एकनाथ मोरये, निलेश मोरये,विजय मोरये,तोसीम नावलेकर,प्रविण मोरये आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

         *🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!