कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सेवानिवृत्ती निमित्त कळसुलकर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री संतोष वैज व चतुर्थ वर्ग कर्मचारी विलास कोंडूरकर यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभ

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०१:- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री संतोष सिताराम वैज व शाळेचे चतुर्थ वर्ग कर्मचारी श्री विलास राजाराम कोंडूरकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेच्यावतीने निरोप समारंभ शाळेत नुकताच पार पडला.

संस्थेच्या वतीने दोन्हीही सत्कारमूर्तींना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल ,श्रीफळ देऊन भूषविण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष वैज यांचे चिरंजीव श्री अभिनव संतोष वैज हा एमपीएससी उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा वेळी दोन्हीही सत्कारमूर्तींचे परिवारातील सदस्य उपस्थित होते. सत्कारमूर्तींना मान्यवरांकडून भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रशालेच्या हरितसेनेच्या वतीने प्रमुख श्री एस व्ही भुरे व श्री अनिल ठाकूर यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्री वैज व श्री कोंडूरकर यांना माडाची रोपे देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमा वेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी, विद्यार्थ्यांनी व हितचिंतकांनी श्री संतोष वैज सर व श्री विलास कोंडूरकर यांविषयी व प्रशालेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एन पी मानकर, शिक्षक वर्गातून श्री एस व्ही भुरे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यातून वैभव केंकरे, माजी मुख्याध्यापक श्री सी ए काटे, श्री अल्ताफ खान सर, पालक वर्गातून श्री रांगणेकर, संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई आदी व्यक्तीने आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती श्री संतोष वैज व श्री विलास कोंडूरकर यांनीही आपल्या प्रशाले विषयी असलेली आस्था,तळमळ, प्रशालेतील अनुभव आपल्या मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई हे होते.या समारंभप्रसंगी उपाध्यक्ष श्री मोहन वाडकर, सचिव डॉ प्रसाद नार्वेकर, संचालक श्री रवींद्र स्वार, श्री गौरांग चिटणीस,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्री अल्ताफ खान,श्री चंद्रकांत काटे, श्री अशोक कुलकर्णी उपस्थित होते. तसेच प्रशालेचे सेवानिवृत्त माजी शिक्षिका श्रीम.पी व्ही फातर्पेकर मॅडम, श्री डी बी पावसकर, श्री घनश्याम जोशी,श्रीम एस आर सावंत, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री आर बी परब, माजी विद्यार्थी नंदकुमार गावडे,माजी विद्यार्थी श्री साळगावकर, साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सलीम तकिलदार तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, चतुर्थ वर्ग कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर यांनी तर सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम.एस एस चव्हाण यांनी केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!