कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 त्रिरत्न बौद्ध महासंघ, सिंधुदुर्ग केंद्राच्या वतीने त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गेन संघरक्षित यांची जयंती साजरी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२८:- त्रिरत्न बौद्ध महासंघ, सिंधुदुर्ग केंद्राच्या वतीने त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक आणि सर्वांचे कल्याणमित्र पूज्य उर्गेन संघरक्षित यांची 98 वी जयंती रविवार दि. 27 ऑगस्ट रोजी बांदा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आदरणीय धम्मचारी जीनरूची (चिपळूण )यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रवचनात भंते संघरक्षित यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांचे अधूरे राहिलेले स्वप्न भंतेनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून एक आदर्श धम्मसेवक बनवून सुरू ठेवले आहे. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श समाज निर्मिती साठी भंतेनी आपले संपूर्ण आयुष्य बुध्द, धम्म, संघासाठी समर्पित केले आहे, असे आपल्या प्रवचनातून आद. धम्मचारी जीनरूची यांनी सांगितले.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते भगवान बुद्ध , डाॕ. बाबासाहेब आंबेडकर आणि भंते संघरक्षित यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पाली-पूजा घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत अनुक्रमे धम्ममित्र सिध्दार्थ तांबे व धम्ममित्र शांताराम असणकर यांनी केले. सूत्रसंचलन धम्ममित्र परेश जाधव यांनी तर आभार धम्ममित्र श्रध्दा असणकर यांनी मानले. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग केंद्राचे चेअरमन धम्मचारी अमृतसागर, धम्मचारी तेजबोधि, धम्मचारिणी यशोमती यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे धम्ममित्र अनिल उगवेकर, अजय तांबे, अभय पावसकर, विष्णू उगवेकर, किशोर यादव, सीमा कांबळे, वैभवी तांबे, रुपाली जाधव, कांता जाधव, सुरेश जाधव, लाडू जाधव, पत्रकार मोहन जाधव, वसंत जाधव, संदीप वायंगणकर, उदय असणकर, स्मिता वायंगणकर, शीला हेवाळेकर, मीनाक्षी तेंडोलकर, सुवर्णा तेंडोलकर,भावना जाधव, चैताली जाधव, प्रणाली असणकर ईत्यादी उपस्थित होते. शेवटी असणकर कुटुंबीयांनी सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!