🟥निरक्षर सर्वेक्षण काम करण्यास विरोध
🟥पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेचा निर्णय
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.२२: राज्यातील प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर सर्वेक्षणाचे कामकाज करण्याचे निर्देशित केले आहे. शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून करून शासनाची भूमिका यातून स्पष्ट दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेने या कामाला विरोध केला असून तसे पत्र शिक्षण आयुक्तांना दिले आहे.
आरटीई अॅक्ट २००९ मधील प्रकरण चार मध्ये कलम २७ नुसार शिक्षकांना जनगणना तसेच निवडणूक कामे वगळता इतर कुठलीही कामे देऊ नयेत असे स्पष्ट नमुद केलेले आहे. त्यामुळे निरक्षर सर्व्हेक्षणाचे कामकाज शिक्षकांना देणे म्हणजे आर.टी.ई. २००९ कायद्याचा भंग करण्यासारखे आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालयाचेही ‘आरटीई कायद्यास अनुसरून शिक्षकांना जनगणना तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे न देण्याचे आदेश निर्गमित आहेत. तसेच शालेय शिक्षण विभाग शासन निर्णयानुसार नगरपालिका अंतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना फक्त निवडणुका व जनगणना यांसारखी राष्ट्रीय महत्वाची कामे व्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे शासन आदेश आहेत. त्यामुळे शिक्षकांना विषयांकित अशैक्षणिक कामकाज करण्यास भाग पाडणे संयुक्तीक नाही. सबब अशैक्षणिक कामकाज कार्यरत शिक्षकांकडून करून घेण्यास संघटनेचा विरोध असून यावर बहिष्कार असल्याचे संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष अनिल पलांडे व सरचिटणीस मनोज मराठे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

