🟥 जिल्ह्यास्तरीय नक्षञ काव्य मैफल बांदा – (ता.सावंतवाडी) येथे उत्साहात संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२२:- नक्षत्राचं देणं काव्यमंच-शाखा ता. सावंतवाडी-जि सिंधुदूर्ग “या काव्य चळवळीची जिल्ह्यास्तरीय काव्य मैफल बांदा येथे नुकतीच उत्साहात ‘वन्स मोअर’ च्या जयघोषात संपन्न झाली.
या काव्य मैफलीला विशेष मान्यवर म्हणुन बांदा ग्रामपंचायत सरपंच मा.श्रीम. प्रियांका प.नाईक,बांदा उपसरपंच मा.श्री.जावेद हुसेन खतीब, वाफोली ग्रामपंचायत सरपंच मा.श्री.उमेश शिरोडकर, उपसरपंच मा.श्री.विनेश गवस, ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.मंथन गवस या मान्यवरांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचं कौतुक करून शुभेच्छां दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास जाधव म्हणाले की,”आपल्या कोकणातील कवी कवयिञींना या माध्यमातुन आपल्या रचना सादर करण्याची संधी मिळाली,अनेक दर्जेदार कवींच्या कविता ऐकण्यास मिळाल्या.आपल्या खेडोपाडी प्रचंड साहित्यिक ऊर्जा आहे.कविला समाजाने जपले पाहीजे.अशा व्यासपीठामुळे माय मराठी समृध्द होते.अनेक कवी आपले प्रकाशात येतील.संस्थेचे कार्य हे कौतुकास पाञ आहे.सर्वांना विनामूल्य सहभाग असतो.नवनिर्मितीचे बीजे अशाच ठिकाणी पेरली जातात.भविष्यात या व्यासपीठावरुन अनेक साहित्य उदयाला येईल अशी मला आशा आहे.सावंतवाडीकरांसाठी ही आनंदाची पर्वणी आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन कवी.लेखक माजी.मुख्याध्यापक.श्री.कैलास जाधव सर तसेच उद्घाटक म्हणुन शिक्षक,कवि, लेखक मा.श्री.मनोहर परब सर लाभले.
कणकवली, वेंगुर्ल्या,कुडाळ,इन्सुली,बांदा तसेच गोव्याहुनही कविवर्य- कविवर्या सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवाह आणि कौतुक मिळविले.
नक्षत्राचं देणं काव्यमंच-महाराष्ट्र ही संस्था गेली तेवीस वर्ष विविध उपक्रम राबवित नव कविंना कवयित्रीना घडवत आहेत. त्यांना मानाचे स्थान आणि व्यासपीठ देवुन त्यांचा गौरव करीत आहेत.
या काव्यमंच चळवळीचे संस्थापक अध्यक्ष कवी वादळकार प्रा.राजेंद्र सोनवणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्ष कविवर्य उदय सर्पे यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रेरणेने असे काव्य मैफलीचे कार्यक्रम आपल्या बांदा-सावंतवाडी मध्ये वेळोवेळी आयोजित केले जातील असे नक्षत्राचं देणं काव्यमंच-महाराष्ट्र चे सावंतवाडी अध्यक्ष कविवर्य. मा.श्री.कृष्णा जनार्दन गवस यांनी सांगितले. या संपुर्ण कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कविवर्या,शिक्षिका सौ.निता सावंत-गवस यांनी केले.
या संपुर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन “माझे कुटुंब माझे नातेवाईक”या व्हॉट्सअँप ग्रुप ने यशस्वीपणे केले.
यावेळी प्रत्येक कवी कवयिञीला विनामूल्य सहभाग दिला,तसेच प्रत्येकाला काव्यवाचन केल्याबद्दल आकर्षक सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सावंतवाडी विभागप्रमुख कवी सखाराम गवस यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोठी भूमिका बजावली.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

