🟥आंबोली पर्यटन महोत्सवासाठी दोन कोटींचा चुराडा….* *🟥लोकांचा सहभाग नसल्याने फ्लॉप शो. -शिवसेना (उ.बा.ठा.)गटाचा आरोप
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग,दि१६ऑगस्ट.:*
वर्षा पर्यटन महोत्सव आंबोली आयोजित करण्याचे सर्व श्रेय हे जिल्हाधिकाऱ्यांचे आहे त्यासाठी शिवसेना(उद्धव ठाकरे) आम्ही त्यांचे अभिनंदन करीत असून सत्कार देखील पक्षाच्या वतीने करणार आहोत.२ कोटी रुपये खर्च करून पर्यटन संचनालायने चुराडा केला.हा महोत्सव ज्या पद्धतीने व्हायला हवा होता त्या पद्धतीने झाला नसून फ्लॉप शो ठरला.लोकांचा देखील त्यात सहभाग नाही. त्यामुळे याच्या बिलाला मंजुरी देताना चौकशी करूनच देण्यात यावी.पुढच्या वर्षीचे नियोजन,जागा,आयोजन याबाबत देखील निवेदन देण्यात येणार आहे.तसेच धबधब्याना चित्रपटांची नावे देण्याचा प्रकार विचित्र आणि अशोभनीय आहे. अशी माहिती विभाग अध्यक्ष बबन गावडे,बुधाजी पाताडे,अनिल चव्हाण यांनी दिली. आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे सर्व श्रेय हे जिल्हाधिकाऱ्यांचे आहे.2 महिन्यांपूर्वी चिपी विमानतळ येथे पर्यटन विभागाचे मुख्य संचालक आणि सचिव तसेच राज्याचे प्रधान सचिव आणि मुख्य सचिव यांच्याशी आपण चर्चा करून जिल्ह्याचा एक पावसाळ्यात पर्यटन महोत्सव असावा.हे आपण ठरवून तशी चर्चा केली. जगभरात बर्लिन महोत्सव,कान्स महोत्सव,ओणम महोत्सव,जैसलमेर महोत्सव याप्रमाणे आंबोली च्या नावाने महोत्सव सुरू करून त्यातून पर्यटन वाढावे हा उद्देश आहे आणि हे पहिले पाऊल असून दरवर्षी असा उपक्रम सुरू ठेवावा असा उद्देश असल्याचे त्यांनी आंबोलीत सांगितले.हे उल्लेखनीय असून आम्ही त्यांचा सत्कार देखील करणार आहोत.आंबोलीच्या वनअमृत,जंगलसफारी अशा पर्यटन योजनांना मंजुरी दिली आहे.केरळ च्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे करून दाखवले आहे.यापूर्वी धबधब्याकडे रेलिंग नव्हते तेव्हा अनेक घटना घडत तेव्हा त्याठिकाणी मंत्रीमहोदयानी निवेदन नाकारले मात्र त्याच कामासाठी तत्कालीन उपवनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी २ दिवसात स्टील चे रेलिंग मंजूर करुन ८ दिवसात काम झाले.हे प्रशासकीय अधिकारी करू शकतात हे आम्ही पाहिले आहे. वर्षा पर्यटन महोस्तव साठी २ कोटी अंदाजित खर्च आहे उदघाटन साठी २० लाख खर्च दाखवले.ग्रामपंचायत ने निमंत्रण पत्रिका बॅनर छापले मात्र लोकांचा सहभाग हा अत्यल्प होता.उदघाटनसाठी स्थानिक ३०-३२ सुद्धा लोक नहोते.बचतगटांना देखील आदल्या दिवशी सांगितले. ग्रामपंचायतीने देखील फक्त स्वतः च्या पत्रिका आणि बॅनर बाजी पलीकडे काहीच केले नाही.मंत्री महोदय उदघाटन साठी जवळपास २५ पोलीस सकाळपासून विविध अधिकारी कर्मचारी संध्याकाळ पर्यंत साधा चहा देखील दिला नाही.व्हेन्चर या अंधेरी येथील कंपनीला ठेका देण्यात आला आहे.त्यामुळे बिल देताना कोणत्याही वारेमाप खर्चाला मंजुरी देऊ नये.कोट्यवधी रुपये खर्च यासाठी झालाच नाही.पर्यटन प्रकल्प अधिकारी हनुमंत हेडे यांचे कसलेही नियोजन नाही, स्थानिकांना देखील विश्वासात घेतले नाही त्यामुळे लोकांनी पाठ फिरवली. हा महोत्सव भव्यदिव्य होणे गरजेचे होते त्यासाठी सेलिब्रिटी याना आणणे गरजेचे होते.दिमाखदार कार्यक्रम ठेवणे गरजेचे होते तसेच स्थानिक देखील कार्यक्रम चे भरगच्च आयोजन करणे गरजेचे होते. पर्यटन संचनालाय ने टूर आणल्या त्याचे नियोजन हे त्यांनी केले मात्र हॉटेल व्यावसायिक किंवा अन्य लोकांना देखील माहिती देणे आवश्यक होते स्थानिकांची बैठक त्यासाठी घेणे आवश्यक असते. एकंदरीत हा फ्लॉप शो ठरला.पुढच्या वर्षीचे नियोजन आणि व्यवस्थापन या बाबत आम्ही निवेदन देणार आहोत. हजारो वर्षापासून नैसर्गिक धबधब्याना नावे देण्याचा हा विचित्र प्रकार आहे.धबधबे आंतरराष्ट्रीय करणार ही घोषणा करून ५ वर्षात लोखंडी एक ठिकाणी शिढी केल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी बारसे करण्याचा घाट घातला. मराठी भाषामंत्री हे तेलगू आणि तामिळ चित्रपटातील बाहुबली नाव देतात उद्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील मंदाकिनी च्या सिनेमात तसेच अनेक सिनेमात धबधबे आहेत म्हणून सिनेमांची नावे देत जाणार काय आंबोलीत अशी कित्येक ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत त्यांना कित्येक नावे दिल्यास विचित्रपणा येणार आहे उद्या मंत्री बदलल्यास नावे बदलतील.महाराष्ट्र एकमेव मराठी राज्य असून खुद्द भाषा मंत्री हे तेलगू तामिळ भाषेचा प्रचार करीत आहेत.दक्षिणेकडच्या नावांची इथे गरज काय? आपले वेगळेपणा नैसर्गिक ठेवा शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.त्याला विचित्रपणा देण्याची प्रथा पाडायची गरज नाही.त्यामुळे बाहुबली हे नाव आणि बारसे करण्याचा खटाटोप हे त्यांनी कायतरी केल्याचे दाखवण्यासाठी केला त्याला आम्ही किंमत देत नसून जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे लोकांचे सह्यांचे निवेदन देणार आहोत. घाटात कोणत्याही नावांची गरज नाही.पश्चिम भारतातील आंबोली घाट हे स्वतंत्र्य नाव पर्यटनासाठी पुरेसे आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

