कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

सिंधुदुर्गात ध्वजारोहणाचा मान दीपक केसरकराना

*🟥सिंधुदुर्गात ध्वजारोहणाचा मान दीपक केसरकरना*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१२:* स्वातंत्र्य दिनी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी तब्बल चार वर्षानंतर राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री तथा कोल्हापूर व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आली आहे. केसरकर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे कोल्हापूरचे ध्वजारोहण करणार आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान देण्याऐवजी ठाणे जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे. केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे
पालकमंत्री असताना ध्वजारोहण केले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची वर्णी लागली. त्यानंतर केसरकर यांना अडीच वर्षे मंत्रिपद नव्हते. मात्र, या घडामोडीनंतर गतवर्षी शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षणमंत्री म्हणून दीपक केसरकर यांची वर्णी लागली. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे केसरकर यांचे ध्वजारोहणाचे स्वप्न अधुरे राहिले होते. आता तब्बल चार वर्षानंतर केसरकर यांना हा मान
प्राप्त झाला आहे.

*ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते नाही हा अवमानच!*

*सावंतवाडी*

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ध्वजारोहण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होत नाही, हा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा तसेच जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान नाही का? स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण ” त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच होणे गरजेचे आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे कसे काय ध्वजारोहण करणार? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!