कोकणमहाराष्ट्रमालवणशासकीय

३५३ कलमाखाली आता पाचऐवजी दोन वर्षांची शिक्षा

*🟥३५३ कलमाखाली आता पाचऐवजी दोन वर्षांची शिक्षा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.१२:* भारतीय दंड संहिता १८६० च्या अधिनियम क्रमांक ४५ च्या कलम ३५३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार गॅझेट करण्यात आले आहे. या कलमानुसार यापूर्वी पाच वर्षांपर्यंत शिक्षा करण्याची तरतूद होती. आता त्यात दुरुस्ती करून दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
शासनाने केलेल्या बदलामुळे आता ३५३ अंतर्गत लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पांडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करण्यासाठी दोन वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा करण्यात येणार आहेत. हा गुन्हा दखलपात्र राहणार असून जामीनपात्र राहणार आहे.
या शिक्षेमध्ये बदल करताना शासनाने असे स्पष्ट केले आहे, भारतीय दंड संहिता १८६० च्या क़लम ३५३ मध्ये, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करण्याच्या अपराधाबद्दल फौजदारी
प्रक्रिया संहिता, १९७३ च्या पहिल्या अनुसूचीमध्ये पाच वर्षांपर्यंत असू शकेल, इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील, अशी तरतूद आहे. याबाबतीत असे निदर्शनास आले आहे की, या तरतुदीचा वापर लोकप्रतिनिधी व त्यांच्यासोबत माहिती संकलनास गेलेले पत्रकार, माहिती कार्यकर्ते यांच्या विरोधात नोकरशाहीने वापरल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लोकसेवक किंवा पत्रकारितेतील व्यक्तींना या तरतुदींचा वापर करण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तरतूद असणे आवश्यक आहे. या गुन्ह्यासाठी असलेली शिक्षा देशांतर्गत सर्व राज्यात दोन वर्षे असताना केवळ आपल्या राज्यात पाच वर्षे शिक्षेची तरतूद असल्याने संविधानाच्या अनुच्छेद १४ चा भंग होत असल्याचे निदर्शनास आले. या गुन्ह्याची चौकशी सत्र न्यायालयात करण्याची तरतूद असल्याने गुन्हेगारास न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करावा लागतो. या प्रक्रियेला किमान सात दिवसांचा कालावधी जातो…
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!