कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दिलदार मनाचा राजा माणूस बाळ साळगांवकर

दिलदार मनाचा राजा माणूस बाळ साळगांवकर…

बाळ साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असा सर्वांनाच आवडणारा आपल्या भावंडावर मनापासून प्रेम करणारा सर्वांचा बाळ तर भावांचा भाऊ आज आपल्या कुटुंबाला मीत्र वर्गाला सोडून जाण्याला बारा दिवस पूर्ण होत आहे,या निमित्ताने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न..
गवळी नाका व आताच्या राजा छत्रपती शिवाजी चौक येथे बाळ नावाचे वादळ अजूनही घोंघावतेय.. शब्दात चापकाचा मार या उलट म्हणी प्रमाणे गवळी नाका येथे गेली सहा दशक ज्यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने आपले वलय निर्माण केले व अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले असे बाळ साळगावकर यांना जाऊन आज बारा दिवस पूर्ण होत आहेत, मैत्रीच्या जीवनातील बादशहा असे बाळ साळगावकर यांना संबोधले जायचे, बाळ त्या काळात तरुणांचा ऑयडाॅल म्हणून पाहिला जायचा,कबड्डीपट म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी केली होती, रत्नागिरी येथील आयटीआय मध्ये टर्नर फिटरचे प्रशिक्षण पूर्ण करून फक्त आपली लहान भावंड आहेत त्यांचा सांभाळ व्हायला पाहिजे म्हणून व्यवसायाचा स्वीकार केला सुरुवातीला वडिलांचा परंपरागत व्यवसाय सांभाळला त्या पुढच्या काळात स्वतःची ओम साई ट्रॅव्हल्स एजन्सी सुरू केली, पुणे, मुंबई बसेस मोठ्या प्रमाणात त्या काळात गवळी तिठा येथून सुटायच्यात, मुंबईतील लालबाग ,परळ, भायखळा,चीच पोकळी ,धोबी तलाव येथे ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये साळगावकर यांचा धबधबा होता.
आताचे मंत्री छगन भुजबळ यांची एकविरा बस होती भुजबळ ही त्यांच्या त्या ट्रॅव्हल मधून अनेक वेळा सावंतवाडीत आलेले,ट्रॅव्हल एजन्सी क्षेत्रात बाळ साळगावकर यांनी आपले एक वेगळे नाव प्रस्थापित केले होते, अनेक आमदार, खासदार यांनी बाळ साळगांवकर यांच्यामार्फत त्याकाळी बसमधून प्रवास केला त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, त्याबाबतच्या आठवणींना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनीही उजाळा दिला होता, ट्रॅव्हल्स एजन्सी चालवताना मालक ,कामगार हा भेदभाव न ठेवता सर्वांना एकत्र कुटुंबात सामावून घेतले, प्रत्येकाला भागीदारी दिली,त्या भागीदारीमध्ये हिस्सेवारी तयार केली, कोणाचा 20 पैसे कोणाचा 30 पैसे कोणाचा दहा पैसे असा हिस्सा तयार झाला व गुण्या गोविंदाने पंधरा वीस जणांची तरुणांची फौज ट्रॅव्हल एजन्सी मध्ये निर्माण केली गेली, अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम त्याकाळी बाळ साळगांवकर यांनी केले.
बाळ साळगावकर रुबाबदार व्यक्तिमत्व होते,टापटीप राहणे त्यांना पसंत होते, तसाच त्यांचा आवाजही भारदस्त होता, त्यामुळे प्रत्येक प्रवास करणार प्रवासी ही त्यांच्याशी सौजन्याने वागायचा ,प्रसाद पावसकर अनिल शिरसाट, किशोर शिरसाट, अशोक कोरगावकर, रमाकांत पोकळे, फ्रान्सिस आलमेडा, दिगंबर माटेकर, राजन बिरोडकर ,बबन गावडे, भाई दळवी, रूजाय आल्मेडा गुरु वालावलकर असा संपूर्ण सावंतवाडीमध्ये बाळसाळगांवकर यांचा मोठा मित्र वर्ग होता.
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे ते संस्थापक होते, गवळी नाका येथे गुढीपाडव्याला पूजा व पडद्यावरील सिनेमा दाखवायला त्यांनी सर्वप्रथम सुरुवात केली, त्याकाळी पडद्यावरील सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची मात्र प्रेक्षकांचा कुठे आवाज येत नव्हता एवढा आदरयुक्त दरारा त्याकाळी बाळ साळगावकर यांचा होता,ते क्रिकेट प्रेमी होते,धावफलक बोर्डावर लिहायची सुरवता त्याकाळी सर्वप्रथम बाळ साळगावकर यांनीच केली होती,हे सर्व करत असताना बाळ साळगांवकर यांना खंबीर साथ दिली त्यांच्या कुटुंबाने त्यांचे भाऊ सुनील साळगावकर व दुसरे भाऊ माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,बहिण ,यांची त्यांना खंबीर साथ होती, बाळ साळगावकर यांच्या अचानक जाण्याने फक्त गवळी नाकाच नव्हे तर सावंतवाडीतील अनेक जुने मित्र पोरके झाले आहेत.
गवळी नाका येथे लुंगी व खांद्यावर नॅपकीन टाकून फिरणारे बाळ सागावकर आता मात्र त्यांच्या मित्र वर्गांना दिसणार नाही ही खंत सर्वांना आहे..मरावे परी कीर्ती रुपी उरावे या काव्यपक्ती प्रमाणे बाळ साळगावकर यांनी आपली कीर्ती मागे सोडून गेले. त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वराने चिरशांती देऊन त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पचविण्याची ताकद देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!