कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥कुडाळमधील शाळकरी मुलाचे आकस्मिक निधन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कुडाळ, दि.११: मूळ देवगड तालुक्यातील जामसंडे- श्रीकृष्णनगर येथील रहिवासी व सध्या कुडाळ- माठेवाडा येथे राहणाऱ्या ध्रुव मुकेश आंबेरकर (११) याचे बुधवारी उपचारादरम्यान निधन झाले. त्याला उलटी झाल्याने तसेच ताप येऊन अशक्तपणा आल्याने ८ ऑगस्ट रोजी कुडाळ येथील डॉ. रावराणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्याला नऊ ऑगस्ट रोजी पडवे येथील एस. एस. पी. एम. रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले, ध्रुव येथील कुडाळ हायस्कूलमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने आंबेरकर कुटुंबाला धक्का बसला असून जामसंडे गावावर शोककळा पसरली आहे. पडवे येथे निधन झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. मात्र, मृत्यूमागील निश्चित कारण समजू शकले नाही. ध्रुव याला उलटी झाल्याने अशक्तपणा आल्याने आठ रोजी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना नऊ ऑगस्ट रोजी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पडवे येथे हलविण्यात आले.. तेथे त्याचे निधन झाल्याचे घोषित केल्याचे देवगड पोलिसांना ध्रुवच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या रुग्णावर उपचार कुडाळ व पडवे येथे झाल्याने हे प्रकरण देवगड पोलिसांनी कुडाळ पोलिसांकडे वर्ग केले आहे. ध्रुव याच्यावर जामसंडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!