🟥नोकरीत डावलल्याने उपोषणाचा इशारा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.११: सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना वारस हक्काने मिळणारी नोकरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने डावलल्याने व अर्ज, विनंत्या करूनही वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारल्याच्या निषेधार्थ शेर्ले-सिद्धार्थनगर येथील उमेश आपा जाधव या तरुणाने स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार उमेश जाधव यांचे वडील कै. आपा कृष्णा जाधव हे जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत सफाई कर्मचारी म्हणून सेवेत होते. ते वयोमानानुसार ३१ मे २०११ रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होताना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या मुलांना वारस हक्काने नोकरी दिली जाते. याचे पत्र प्रशासनाने त्यांना देणे आवश्यक होते. मात्र, त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर उमेश जाधव यांनी कार्यालयाकडे अर्ज सादर केला. मात्र, सदरचा अर्ज मुदतीत नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला होता.
शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत आपणाला मुदत लागू होत नाही, ही बाब त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने वेळकाढू धोरण स्वीकारल्यानंतर १ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले होते. मात्र, वर्ष- दीड वर्ष होऊनही त्या कार्यालयाने दखल न घेतल्याने नाईलाजास्तव येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

