नितेश राणे हात वर करून ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणायला तयार!
▪️नितेश राणेंची इनोवा कार जिल्हा बँकेत उभी का; शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत यांचा सवाल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०४: काही लोक खऱ्याला खोटं व खोट्याला खरं म्हणतात. कारण ढळढळीत सत्य खोटं कस असू शकतं ते पाहायचं? तर नितेश राणे गेली कित्येक वर्षे वापरत असलेली एम. एच. ०७ डब्ल्यू ००२३ या नंबरची इनोवा कार जिल्हा बँकेत उभी कशी? कारण काही लोक लबाडी करणेसाठी दुसऱ्याच्या नावाचा वापर करतात, हेही तुमच्या लक्षात येईल. गाडी मालक वेगळा व गाडी वापरतो वेगळा हे प्रत्येकाला माहित आहे. गाडी दुसऱ्याच्या नावावर घ्यायची व ती कर्जे थकीत ठेवायची ही तर फसवेगिरी नंतर ती गाडी बँकेने घेतली तर मालक दुसरा असल्याने त्याचे नाव बदनाम आणि पुन्हा नितेश राणे हात वर करून ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणायला तयार! असो; ही फसवेगिरी नितेश राणेनाच लख लाभ असो; असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शिवसेनेचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत यांनी म्हटलं आहे.
१२ बोलेरो गाड्यांचे कर्ज राणे कुटूंबियांनी काँग्रेस पक्षात असताना घेतले. हे पूर्ण सत्य पण; त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेले व आता दोन पक्ष बदलून भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले राजन तेली हेच बँकेचे अध्यक्ष होते व त्यांनीच ही चुकीची कर्जे दिली होती. हे राणे कुटुंब व राजन तेली विसरले काय? आता चुकीचे कोण करत होतं हे जनतेला समजल. नितेश राणे बोलेरो गाड्या वापरत नाहीत. मार्केटमधील सर्वांत महाग गाड्या वापरतात हे सत्य आहे. त्यांची गाड्यांची शोरूम आहेत हे सत्य आहे. दुसऱ्याच्या नावावरचे पेट्रोल पंप ते चालवतात हे सत्य आहे. त्यांनी ठरवल तर गाडी निर्मिती करणारी मोठी कंपनीही खरेदी करू शकतात हेही सत्य आहे. पण त्यांच्या शोरूम मध्ये त्यांच्या प्रत्येक व्यवसायात काम करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाहीत हेही सत्यच आहे ना? अशी टीका सावंत यांनी केली आहे. बोलेरो गाड्यांपैकी काही गाड्यांची कर्जे कर्जदारांनी स्वतः भरली. व त्या गाड्या आता नितेश राणे त्यांच्या ताप्यात आहेत.असेही पत्रकात म्हटले आहे.
नितेश राणे आधी उद्योजक व नंतर व्यावसायिक राजकारण करतात हेही आम्ही मान्य करतो. पण व्यवसायातील नफा स्वतः घेऊन कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवणे हे समाजकार्य असेल आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना योग्य वाटत असेल तर आमचे काही म्हणणे नाही. पण ही फसवेगिरी, खोटेपणा व स्टंटबाजी आता सिंधुर्गातल्या जनतेला समजला आहे. त्यामुळे आपल्याच कार्यकर्त्यांना थकीत ठेवणाऱ्या नितेश राणेंसमोर आता तारे चमकायला लागलेत. म्हणूनच ते जिल्हा बँकेवर खोटे आरोप करत असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.
नितेश राणे यांना कार्यकर्त्यांची आपुलकी तळमळ असेल तर त्यांच्या नावावर घेतलेल्या गाड्यांची रक्कम भरून निदान कार्यकर्त्यांवर बँकेकडून कारवाई होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मगच जिल्हा बँक निवडणूक जिंकण्याची भाषा करावी.असे सावंत यांनी म्हटले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

