वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही तासात हरवलेल्या मोबाईलचा लावला शोध..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०४: तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही तासात हरवलेल्या मोबाईलचा शोध लावत तो मोबाईल मालकाला परत केला आहे. पोलीस राठोड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व संदीप राठोड यांचे मोबाइल मालक किशोर भोसले व सोनाळी ग्रामस्थ यांनी आभार मानले.

किशोर भोसले रा. सोनाळी यांचा मोबाईल सोनाळी ते वैभववाडी या मार्गावर हरवला होता. मोबाईल हरवल्याची माहिती त्यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस संदीप राठोड यांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्या मोबाईलचा शोध लावला. ज्या व्यक्तीकडे मोबाईल होता, त्या व्यक्तीपर्यंत पोलिस अलगद पोहचले. तो मोबाईल पोलिसांनी घेत मूळ मालक किशोर भोसले यांला दिला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत केलेल्या कामगिरीबद्दल उद्योजक अशोक चव्हाण यांनी अतुल जाधव, संदीप राठोड यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सोनाळी ग्रामस्थ भीमराव भोसले, सचिन कदम, संदीप शिंदे, अनिकेत तांबे व प्रदीप तांबे आदी उपस्थित होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!