आराखडा तयार करण्यासाठी गावातील जबाबदार घटकांनी सहभाग घ्यावा; सभापती अक्षता डाफळे यांचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०४: नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा अतिशय महत्वाचा आहे. नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग कधीही येऊ शकतो. अशावेळी आलेल्या आपत्तीला तोंड देऊन कमीतकमी वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी अभ्यासपूर्णपणे संभाव्य आपत्तीची व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी गावातील जबाबदार घटकांनी यात सहभाग घ्यावा. असे आवाहन सभापती अक्षता डाफळे यांनी केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व सामान्य प्रशासन विभाग, पंचायत समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विदयमाने गाव आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ सभापती अक्षता डाफळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आला. त्यावेळी डाफळे बोलत होत्या. व्यासपीठावर उपसभापती दुर्वा खानविलकर, पंचायात समिती सदस्य हर्षदा हरयाण, लक्ष्मण रावराणे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, नायब तहसिलदार सौ.कासकर, प्रशिक्षण संस्था ज्ञानदा पुणेचे प्रशिक्षक श्री. परदेशी आदी उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणास तालुक्यातील १० गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, आरोग्य सहाय्यक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसभापती दुर्वा खानविलकर,आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. यासाठी सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा आराखडा तायार करावा. असे सांगितले.
तर हर्षदा हरयाण म्हणाल्या, आपत्तीचा सामना करण्यासाठी आपली पूर्व तयारी हवी. या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन गावचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा.
पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे म्हणाले या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या गावचा भौगोलिक अभ्यास करुन आराखडा तयार करावा.
प्रास्तविक प्रशिक्षक परदेशी यांनी केले.तर सूञसंचलन संतोष टक्के यांनी केले.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

