🟥 सुशोभीकरणापूर्वी शहरातील मूलभूत समस्यांना प्राधान्य द्या..
🟥 नगरसेवक रणजीत तावडे ; वाभवे वैभववाडी नगरपंचायत सभेत सत्ताधारी धारेवर..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वैभववाडी, दि-३०-: शहरात गेले चार महिने अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे भर पावसाळ्यातही शहरात तीन-चार दिवस पाणी येत नाही नागरिकांनी काय करावे प्रथम शहरातील मूलभूत समस्यांना प्राधान्य द्या नंतर सुशोभीकरणाची व अन्य कामे करा असे शिवसेना ठाकरे पक्षाचे नगरसेवक रणजीत तावडे यांनी न प सभेमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगले सुनावले.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सभा नगराध्यक्षा नेहा माईनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी न प सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, रेवा बावदाने, यामिनी वळवी, राजन तांबे, सुप्रिया तांबे, प्रदीप रावराणे, रोहन रावराणे, अक्षता जैतापकर, मनोज सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कांबळे आदी नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष संजय सावंत म्हणाले पाणीटंचाईसाठी काही तांत्रिक अडचणी येत आहेत. तरीही आम्ही पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. एप्रिल मे महिन्यात ज्या वार्ड मध्ये पाणीटंचाई होती तेथे स्वखर्चाने पाणीपुरवठा केला असे सांगितले. यावर नगरसेवक तावडे म्हणाले एप्रिल मे मधील कौतुक सांगू नका विहिरीना पाणी असूनही पाणीपुरवठा करण्यात आपण अपयशी ठरला आहात असे सुनावले.
पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विषय असून यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करा त्यात सर्व नगरसेवक व मुख्याधिकाऱ्यांना समाविष्ट करा पाण्यासंबंधीत काही समस्या असल्यास त्याची माहिती सर्वांना कळवा ही माहिती कळविण्यात सोपी जाईल अशा सूचना डॉ राजेंद्र पाताडे यांनी केल्या.
वैभववाडी शहरात बिल्डिंग बंगले घरे बांधण्यासाठी खाजगी विकासाकडून शहरानजींच्या डोंगराचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून प्लॉट तयार केले जात आहेत त्यामुळे डोंगरा खालच्या बाजूला असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे या उखाणामुळे भविष्यात इशाळवाडी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे असे झाल्यास त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार असेल असा इशारा रणजीत तावडे यांनी दिला. यावर मुख्याधिकारी कांबळे म्हणाले अशा लोकांना आम्ही लेखी सूचना देतो.
बॉक्स
शहर विकासासाठी अनधिकृत स्टॉलचे अतिक्रमण हटवण्याबाबत 15 मार्च 2022 रोजी सर्वानुमते ठराव झाला होता. तरीही अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर व विरोधी पक्षाचे नगरसेवक मनोज सावंत हे स्टॉल धारकांच्या बाजूने राहिले त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला त्यांच्या या कृतीच्या निषेचा ठराव उपनगराध्यक्ष सावंत यांनी मांडला.
यावर बोलताना नगरसेविका अक्षदा जैतापकर म्हणाल्या जनतेने आम्हाला निवडून दिले आहे आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो संबंधी स्टॉलधारकाना न प कडून मे महिन्यामध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याचे काय झाले असा सवाल केला. न प च्या प्रभाग 12 व 13 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जातात असा आरोपी अक्षता जैतपकर व तावडे यांनी केला.
वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीत सभांना पत्रकारांना निमंत्रित करण्यात यावे या मागणीसाठी गेले दिड वर्ष झगडणाऱ्या नगरसेविका अक्षता जैतापकर यांच्या मागणीला यश आले. 27 जुलैचे सभेला पत्रकाराना निमंत्रित करण्यात आले. नगरसेविका जैतापकर या विषयांसाठी झगडत होत्या. या विषयासंबंधी त्यांनी महीला दिनी उपोषण देखील छेडले होते. जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात दाद मागितली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

