🟥 आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासाचा किंगमेकर ; संदिप गावडे
🎥 Kokan Live Breaking News
✍️ संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी, दि-२९:- संदिप या नावाचाच अर्थ एक तेजस्वी पेटता दिवा,म्हणतात ते काही खोटं नाही,मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,अगदी तसेच संदिप एकनाथ गावडे यांच्या बाबतीत घडले, फणसवडेचा हा मुलगा भविष्यात एवढी मोठी झेप घेईल असे जोतीषांना पण कुंडलित दिसले नसले, मात्र भूत भविष्य याला आपल्या जीवनात थारा न देता आपण केलेले पुण्यकर्म आपल्याला यशाचा मार्ग दाखवेल हे ब्रिद मनाशी घट्ट रोवून आपल्या गुरुवर अढळ श्रद्धा, विश्वास ठेवून आपले राजकीय नशिब अजमावण्यासाठी पंचायत समिती निवडणूक रिंगणात विलवडे पंचायत समिती मतदार संघात संदीप एकनाथ गावडे हा नवयुवक उतरला.
देवसू,पारपोली,दाणोली ,केसरी फणसवडे ,सातोळी,बावळाट,विलवडे,कोणशी दाभिल,भालावल या मतदार संघात आपले नशिब अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरला व त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा बोलबाला नसताना आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर मातब्बर उमेदवाराला मात दिली व किंगमेकर ठरला.
संदिप एकनाथ गावडे हा फणसवडे चा नवयुवक जन्मभूमी फणसवडे असली तरी कर्मभूमी पूणे, मुंबईच राहिली,मात्र सामाजिक कामाची आवड,त्यातच कुशाग्र बुध्दी,सालस व्यक्तीमत्वच्या जोरावर हा युवक सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी जोडला गेला, रविंद्र चव्हाण यांना आपले गुरु माणून ते मागतिल ती गुरुदक्षिणा द्यायला हा युवक सदैव तत्पर असायचा, त्याचे हे गुण हेरुन रविंद्र चव्हाण यांनी त्याला पंचायत समिती निवडणूक रिंगणात उतरवले व तो जिंकलाही…
आपल्या गुरुने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पडेल ती काम करण्याची तयारी ठेवून संदिप याने पूर्ण मतदार संघ पि़जून काढला, शतप्रतिशत भाजप हे एकच ध्येय ऊराशी बाळगून तहान भूक हरपून झोकून देऊन त्याने काम करायला सुरुवात केली व त्याचे फळही त्याला मिळाले, पूर्ण जिल्हा परिषद मतदार संघात एक दोन ग्रामपंचायत वगळता सर्व ग्रामपंचायत शतप्रतिशत भाजप झाल्या, भाजप नेतृत्वाने हेच गूण हेरुन संदिप गावडे यांना चौकुळ जिल्हापरिषद मतदार संघातून निवडणूक लढविण्यास तयारीस लागायला सांगितल्याचे समजते.
सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र .चव्हाण सांगितील ते धोरण व बांधतील ते तोरण हे वाक्य उराशी बाळगून भाजप पक्षासाठी झोकून देऊन संदिप गावडे पूर्ण मतदार संघात काम करीत आहे,मतदार संघातील एक गाव,वस्ती,वाडी,अशी नाही की जिथे भाजपचा विकास पोहचला नाही,
प्रत्येक मतदारसंघातील गावा मध्ये जाणारा रस्ता,पूल,साकव,अशी शेकडो कोटीची कामे जादू सारखी मंजूर करुन घेतली व मतदार संघाला विकासाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे,हे सर्व आपल्या हक्काचे पालकमंत्री लाभल्यामुळे शक्य झाल्याचे संदिप गावडे आवर्जून सांगतात, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना असलेली विकासाची दुरदृष्टी व .आपल्या गावावरचे प्रेम यातूनच हे .सारे शक्य झाल्याचे संदिप गावडे सांगतात.
संदिप गावडे यांनी आपल्या पूर्ण मतदार संघात महिलामंडळे,बचतगट,जेष्ठ नागरीक, क्रिडा मंडळे,गावविकास मंडळे यांच्यासाठी आपल्याकडून होणारी सर्वोतोपरी मदत केली, म्हणून संदीप नावाचा बोलबाला पूर्ण मतदार संघात आहे,
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची खंबीर साथ,भाजपशी एक निष्ठता,पडेल ती काम करण्याची तयारी, पक्षासाठी झोकून देऊन काम करण्याची क्षमता, उत्कृष्ट संघटन कौशल्य,नम्रता,व गोरगरीब,रंजलेल्या गांजलेल्या, लोकांना मदत करण्याची वृत्ती या जोरावर संदिप एकनाथ गावडे उद्याचा भावी जिल्हा परिषद सदस्य व पुढे जि,प,अध्यक्ष झाल्मास नवल वाटू नये कारन यामागे संदिप गावडे यांची जिद्द चिकाटी, मेहनत,व एकनिष्ठता कामी आलेली असेल.
भाजपचे माजी आंबोली मंडल अध्यक्ष,माजि प़चायत समिती सदस्य संदिप गावडे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाला व भावी वाटचालीस कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कडून लाख लाख शुभेच्छा
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

