महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२७:- मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रिय- तेविरोधात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाबाबत माहिती देताना पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे हे मणिपूर येथील घडणाऱ्या हिंसाचारातून लक्षात येते. दोन महिन्यां- पेक्षा जास्त काळापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तिथलं राज्यातील सरकारही भाजपचे आहे आणि केंद्रातील सरकारही भाजपचं आहे. मात्र हा हिंसाचार थांबवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मणिपूर येथील हिंसाचारावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत, महिलांवर अत्याचार केले जात आहेत, त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अतिशय किळसवाणा प्रकार महिलांसोबत केला जात आहे. तिथल्या सामान्य माणसाला अत्यंत असुरक्षित वाटत असून सरकार विरोधातील देशातील लोकांच्या भावना संतप्त आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

केंद्र सरकारने तिथे लष्कराला पाचारण करून मणिपूर शांत करायला सांगितले पाहिजे. मात्र दोन महिने धगधगत्या मणिपूरकडे सरकार कोणतेही लक्ष देत नाही. सरकारच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात आंदोलन केले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सरकार म्हणतंय विरोधक मणिपूरवर संसदेत चर्चेला तयार नाहीत. मात्र आपचे खा. संजय सिंग यांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी केली तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले. विरोधी पक्ष मणिपूरवर चर्चेची मागणी करतोय मात्र त्यांना बोलू दिले जात नाही. ही गोष्ट धक्कादायक आणि दुर्दैवी आहे असा रोषही त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, महाराष्ट्रातही महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे असे म्हणत, आम्ही हा विषय विविध आयुधामार्फत सभागृहात उपस्थित करत आहोत. मात्र सरकारमार्फत यात चालढकल केली जात आहे असा थेट आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. महिला व मुलींना आखाती देशात घेऊन जातात, त्यांच्याकडून चुकीचे कामे करून घेतात. यात अनेक रॅकेट कार्यरत आहेण. या रॅकेट्सवर एफआयआर दाखल झाले आहेत. मात्र त्यासंदर्भात शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. बेपत्ता महिला व मुलींपैकी काही महिला व मुली मदत मागत असतात. मात्र सरकारकडे त्याबाबत यंत्रणा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रश्न विविध माध्यमातून हा प्रश्न लावून धरणार व हा प्रश्न तडीस लावणार असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!