आणखीक्राइममहाराष्ट्र

गर्भवती तरुणीवर प्रियकर करायचा बलात्कार ; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नागपूर, दि-२७:- एका १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून किटकनाशक प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तपासादरम्यान पीडित तरुणी ही गर्भवती असून आरोपी तरुण जिवे मारण्याची धमकी देत सतत तिच्यावर बलात्कार करीत होता,अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

तरुणीने अनेकदा पोलिसात तक्रार केली होती. मात्र कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने निराश होऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात आता लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. रोहित विजय सोळंकी (२२) रा. आकाशनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडित तरुणी आणि रोहितमध्ये प्रेम संबंध होते. रोहित हा तापट स्वभावाचा आहे. लहान-लहान गोष्टींवरून तो प्रेयसीसह कुटुंबियातील अन्य सदस्यांशी भांडण करीत होता. त्यामुळे तरुणीने दुरावा करीत त्याचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. मात्र त्यानंतरही रोहित तिला त्रास देत होता. भररस्त्यात अडवून तिला धमकावत होता. तिच्या घरी जाऊन हैदोस घालत होता. दोघांचे एकत्र असलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.तरुणीने चार वेळा रोहित विरुद्ध हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही.

रविवारीही रोहितने दुसऱ्या क्रमांकावरून तरुणीला फोन केला आणि भेटायला बोलावले. जबरीने तिला बेसा-घोगली मार्गावर घेऊन गेला. निर्जनस्थळावर तिला मारहाण केली. त्याच्याशी संबंध ठेवले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. ‘मॉर्फ’ करून तिचे अश्लील फोटो बनवले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केला. त्याच्या छळाला कंटाळून तरुणीने सोमवारी रात्री घरात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तरुणी दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. प्रकरण चिघडलेले पाहून पोलिसांनी तरुणीची सविस्तर जबानी नोंदवून रोहित विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!