कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

महेश सारंग यांच्या रौद्ररुपाने विद्यूत अधिकारी झाले सुता सारखे सरळ

*🟥महेश सारंग यांच्या रौद्ररुपाने विद्यूत अधिकारी झाले सुता सारखे सरळ*

*🟥अवघ्या चार तासात बदलेला वायरमन दिला कारिवडे गावाला परत*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कारीवडे, दि.२६:* कारीवडे गावात कार्यरत असलेल्या वायरमन छेपणे यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता, परस्पर बदलण्यात आल्याने कारीवडे गाव दोन कंत्राटी कामगारांच्या जीवावर टाकून काळोखात टाकण्याचे काम विद्युत वितरण कंपनीने केल्याने आज कारीवडे ग्रामस्थांनी आक्रोश आंदोलन केले या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी रौद्ररूप धारण करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले,अखेर अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत सदरचा वायरमन कारिवडेत हजर होईलअसे आश्वासन दिलेव आंदोलन मागे घेण्यात आले.
‌. याबाबत अधिक माहिती अशी की कारीवडे गावात छेपणे नावाचा वायरमन गेले सहा महिने काम करत होता,त्यावेळी गावात कोणत्याही ग्राहकाची तक्रार नव्हती, मात्र ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सदरच्या वायरमन ला माजगाव येथे हलविले व दोन कंत्राटी कामगारांच्या हातात सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात वसलेल्या गावातील वाड्या दिल्या त्यामुळे अनेक वेळा या गावाला काळोखाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत विद्युत वितरण कंपनीला लेखी पत्र देऊनही त्यावर कोणतीही उपयोजना केली नाही म्हणून आज कारीवडे ग्रामस्थांनी भाजपा माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस महेश सारंग ,भाजप तालुका उपाध्यक्ष अशोक माळकर, सरपंच सौ माळकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.
यावेळी महेश सारंग यांनी अधिकारी श्री चव्हाण यांना धारेवर धरत वायरमन ची बदली कोणत्या नियमा खाली केली? बदलीबाबत कोणती प्रोसिजर आहे अशी विचारणा करून धारेवर धरले, त्यावेळी चव्हाण यांनी दुपारपर्यंत आपला वायरमन आपल्याला परत देऊ असे आश्वासन दिले,गावातील जिर्ण पोल बदलण्याचे तसेच विद्युत वाहिनीवर आलेली झाडे तोडण्याचे काम ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन लवकरच केले जाईल असा विश्वास चव्हाण यांनी उपस्थितांना दिला,यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुस्कर माजी सरपंच बंटी आमोणकर, लवू पारसेकर ,आनंद तळवणेकर सह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!