आपत्कालीनकोकणराजकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोलीतील जैवविविधता धोक्यात येण्यासाठी वनविभाग जबाबदार…..* *🟥 मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार -संयुक्त वन व्यवस्थापन समिती*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.२६ जुलै:*
आंबोली वनपरिक्षेत्रातील सुरू असलेली विकास कामे संयुक्त वन व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता संबंधीत अधिकारी केवळ निधी खर्च करण्याच्या हव्यासापोटी मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक सुद्धा आयोजित करत नसल्यामुळे आंबोली गावात वनक्षेत्रात होत असलेल्या कामांबाबत ग्रामपंचायत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता आंबोली कबुलायतदार जमीन प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना देखील सदर जमिनीमध्ये वनविभागाने टेहळणी मनोरे उभे केले असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. या विषयी अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात. तसेच केवळ काही ठराविक ठेकेदारांनाच ही कामाची टेंडर मिळत असल्यामुळे येथे संशय निर्माण होत असून आंबोली मध्ये अनेक बेरोजगार अभियंता, मजूर संस्था असताना देखील बाहेरील गावातील व जिल्ह्यातील मजूर आणून त्यांच्या त्यांच्याकडून अनेक कामे करून घेतले जातात. वनविभागाच्या ताब्यात आंबोलीतील अनेक पर्यटन स्थळे असल्यामुळे ग्रामपंचायत कुठलाही निधी खर्च करू शकत नाही संबंधित पर्यटन स्थळावर वनविभागाकडून तो निधी खर्च होणे अपेक्षित असताना वनविभागाचे अधिकारी चुकीच्या ठिकाणी निधीची उधळपट्टी करत आहेत. वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या पर्यटन स्थळावर आजपर्यंत चेंजिंग रूम तसेच स्वच्छतागृहे उभारणे गरजेचे आहे व याची देखभालीचा ताबा वनव्यवस्थापन समितीकडे दिल्यास वन व्यवस्थापन समितीकडे देखील निधी जमा होईल. आंबोलीत शनिवार रविवारी सुमारे 50 हजारापर्यंत पर्यटक उपस्थिती दर्शवतात मात्र ग्रामपंचायतीचे केवळ एकच स्वच्छतागृह आहे.त्यामुळे महिला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होणाऱ्या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या कचरा तयार होतो हा कचरा संकलन करण्यासाठी कोणतीही उपाययोजना वनविभागाकडून केली जात नाही. तसेच आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यातून कचरा आणून डम्पिंग केला जातो यावर गस्त ठेवून कारवाई करण्याची गरज वनविभागाकडून आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनते असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे भविष्यात आंबोलीतील जैव विविधतेची हानी होण्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. यासाठी आंबोली परीक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीचे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे करण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून ठोस अशी कुठलीही कारवाई केली गेली नसल्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांची तक्रार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे आंबोली ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले .

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!