कोकणदेवगडमहाराष्ट्र

नारिंग्रे येथील तरुणाचा ओढ्यात सापडला मृतदेह

*🟥नारिंग्रे येथील तरुणाचा ओढ्यात सापडला मृतदेह*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.२७:* नारिंग्रे-बावकरवाडी येथील मंगेश शांताराम शिंदे (४५) याचा मृतदेह तेथील सडा गायगोठण भागातील त्याच्या मालकीच्या शेतमांगरानजीकच्या वहाळात आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारिंग्रे – बावकरवाडी येथील शांताराम बापू शिंदे यांची नारिंग्रे सडा गायगोठण या भागात शेतजमीन आहे. तेथे ते मुलांसमवेत शेती करतात. शेतजमिनीतच त्यांचा शेतमांगर आहे. त्यांचा मुलगा मंगेश हा नेहमी रात्री शेतमांगरात झोपायला जात असे. सोमवारी रात्री जेवण आटोपून नेहमीप्रमाणे तो शेतमांगरामध्ये झोपण्यास गेला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास वडील शांताराम शिंदे हे शेतमांगराकडे मंगेशसाठी चहा, नाश्ता घेऊन गेले. यावेळी तो शेतमांगरात दिसला नाही. मांगरानजीकच्या वहाळाकडे तो गेला असेल, असे समजून ते तेथे पाहण्यास गेले. यावेळी वहाळाच्या पाण्यात मंगेश हा मृतावस्थेत दिसला. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला वहाळांतून बाहेर काढण्यात आले. मंगेश हा अविवाहित होता. घटनेची खबर शांताराम शिंदे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!