🟥 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तडफदार नेतृत्व ; राजन तेली
🎥 Kokan Live Breaking News
✍️ संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी, दि-२५:- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील घोंगावता वारा व दमदार नेतृत्व म्हणजे माजी आमदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, तथा या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते, शांत ,संयमी, गोरगरिबांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा नेता म्हणून राजन तेली यांच्याकडे पाहिले जाते. अगदी शिवसेनेचे शाखाप्रमुख पासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार ,भाजप जिल्हाध्यक्ष ,अपक्ष उमेदवारी भरत विधानसभेत केवळ 12000 मतांनी पराभूत झालेले, परंतु खचून न जाता या जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे असलेले अनेक वादळे झेलणारे ,आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे वारू अटकेपार नेणारे, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपले राजकीय वजन ठेवून असणारे राजन तेली… आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाला सर्वप्रथम कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा
शिवसेनेच्या शाखाप्रमुख प्रमुख पासून हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारे राजन तेली, यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आलेत, अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले, प्रसंगी तुरुंगातही राहावे लागले, काहीही दोष नसताना राजकीय दवाखाली एखाद्याला ज्यावेळी तुरुंगात पाठवले जाते,त्यावेळी त्याच्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल हे न सांगितलेले बरे, मात्र अनेक प्रसंग आले तरी राजन तेली कधी डगमगले नाहीत, ते या पवित्र भूमीवर घट्ट पाय रोवून उभे राहिलेत व परमेश्वराला एकच साकडे घातले तू मला संकटे दिलीस तरी चालेल मी डगमगणार नाही मात्र त्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद माझ्या अंगात निर्माण कर आणि त्याच ताकदीच्या जोरावर राजन तेली यांनी आज पर्यंत जो यशाचा आलेख चढता ठेवला तो तसाच आहे.
शांत संयमी असलेले राजन तेली ज्यावेळी व्यासपीठावर उभे राहतात ,तेव्हा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने व गोरगरिबांच्या हृदयाला हात घालणारे प्रश्न उचलून टाळ्या तर मिळवतातच व खऱ्या अर्थाने आपला हक्काचा माणूस बोलतो याची जाणीव खाली बसलेल्या कार्यकर्त्यांना होते, सर्वसामान्यांच्या पंक्तीत बसून जेवणारा नेता म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले राजन तेली यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला, मात्र समाजसेवेचे बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनच मिळाले, मेहनत ,चिकाटी ,याच्या जोरावर त्यांनी राजकारणात जे यश संपादन केले ते अनेकांना थक्क करणारे आहे,गगनचुंबी त्यांचे यश त्यांच्या कर्तुत्वाची जाणीव करून देते, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची संबंध आहेत व ते कशाप्रकारे जोपासले हे त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या वेळी दिसून आले, शिवसेनेचे शाखाप्रमुख ,शहर प्रमुख, पासून अगदी जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांना संघटनेत स्थान मिळाले ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेत, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे ते अध्यक्षही झालेत आपल्या काळात त्यांनी अनेक धरणांच्या कामांना गती दिली, जी अनेक वर्षे धरणांची कामे रखडली होती ती मार्गी लावली, राजन तेली राजकारण,सहकार ,कोणत्याच क्षेत्रात मागे राहिले नाहीत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यश संपादन करून ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले व त्यांच्या कारकीर्दीत जिल्हा बँक ची घोडदौड जोमाने सुरू राहिली.
. . भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत त्यांनी संघटन बांधणीवर भर दिला व जिल्ह्यात भाजप पक्ष एक नंबर वर नेऊन ठेवला,मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती झाल्यामुळे राजन तेली यांना तिकीट मिळाले नाही मात्र अपक्ष उभे राहत त्यांनी समोरच्या उमेदवाराला घाम फोडला व अवघ्या बारा हजार मतांनी राजन तेली यांचा पराभव झाला.
सावंतवाडी मतदारसंघात झालेला हा पराभव राजन तेली यांच्या जिवृहारी लागला मात्र पराभवाने खचून जाणारा तो राजन तेली कसला! त्याने अधिक जोमाने या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली, आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये राजन तेली यांचे नाव आहे, प्रत्येक गावातील लहान थोर मंडळी राजन तेली यांना ओळखतात, किंबहुना राजन तेली ही त्यांना प्रत्येकाला नावाने हाक मारतात, एवढी कार्यकर्त्यांची त्यांची नाळ घट्ट जुळली आहे, तेली यांना विधानसभा मतदारसंघात बाहेरील व्यक्ती म्हणून हिणवले जात होते मात्र तेली यांनी सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकाच्या बाजूला आपली दिमाखदार इमारत उभी केली आहे व पुन्हा एकदा राजन तेली विधानसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत, भाजप पक्षाकडून राजन तेली यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय सोपा आहे, मात्र आघाडीच्या, युतीच्या,भानगडीत उमेदवारी नाही मिळाली तर व राजन तेली अपक्ष उभे राहिलेत तरी तेली यांनी या मतदारसंघात जे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे, ते त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही.
राजन तेली यांना वाढदिवसाच्या कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

