पुणेमहाराष्ट्रसामाजिक

🟥 धोका कायम! मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पुढील 1-2 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पुणे, दि-२४:-* पावसाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळल्याचं आपण पाहिलं. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरीही काही तासांसाठी वाहतुकीचा खोळंबा झाला.

मुंबई- पुणे- एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दरड कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याजवळच दरड कोसळली. परिणामी पुणे- मुंबई मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचा यावेळी खोळंबा झाला. सुदैवानं दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कुठलंही वाहन सापडलेलं नसून आता दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं.

लोणावळ्याजवळील मार्गावर असणारी दरड हटवण्यात आल्याचं यंत्रणांकडून सांगण्यात आलं. असं असलं तरीही सकाळच्या वेळीसुद्धा मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. उर्से टोल नाक्याजवळ अनेक वाहनंही थांबवली जात आहेत. सध्या दरड हटवण्यासाठी यंत्रणां वेगानं प्रयत्न करत असून, काही वेळातच हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

 

परंतु त्या ठिकाणी अद्यापही दरडी पडण्याचा धोका संभवत असल्याने MSRDC ने या संभाव्य दरडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून पुढील 1-2 तासांसासाठी जुन्या मुंबई पुणे मार्गांवरून वाहतूक चालू करून मुंबई कडे जाणाऱ्या तिन्ही मार्गिका (पूर्ण मार्ग ) बंद करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!