कसाल येथे नातेवाईकांकडे आलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबविले
*कसाल येथे नातेवाईकांकडे आलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबविले*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
विनया विजय भोगण सावंतवाडी माजगाव वय ५० ही महिला कसाल कुंभारवाडी येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती कसाल हायस्कूल जवळ महामार्गावर कसाल कुंभारवाडी रस्त्यावर एका
मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकल व्यक्तीने या महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत पलायन केले ती महिला कसाल बालमवाडी स्टॉप येथे एसटीने उतरून कसाल बालमवाडी स्टॉप जवळून कसाल कुंभारवाडी येथे आपल्या नातेवाईकांकडे जात होती. दरम्यान मागून आलेल्या दोन अनोळखी मोटरसायकल स्वरांनी या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून घेत पलायन केले ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्यचे सुमारास घडली . या दोन अज्ञात मोटरसायकल स्वरांनी या रस्त्यावर पुढे जाऊन मोटरसायकल थांबवली व आमची गाडी बंद पडली आहे जवळ गॅरेज कुठे आहे अशी विचारणा केली तर यातील एक माणसाने मंगळसूत्र हिसकावून घेतले या दोघांनी पलायन केले मोटर सायकल स्वरांनी काळे कोट व हेल्मेट घातले होते महिलेने आरडाओरड केली मात्र या महिलेची छत्री हिसकावून देत या दोन अज्ञात मोटरसायकल स्वरांनी तेथून पलायन केले.
