कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

मद्यपी पर्यटकांची नशा पोलीस उतरविणार

*🟥मद्यपी पर्यटकांची नशा पोलीस उतरविणार*

*🟥आंबोलीसाठी खास मोहीम : धांगडधिंगाणा रोखण्यासाठी पावले*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१५:* आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शनिवार-रविवारी हजारो पर्यटक हजेरी लावतात. त्या पार्श्वभूमीवर मद्यपी पर्यटकांना वचक बसण्यासाठी आंबोलीत संशयास्पद पर्यटकांची तपासणी ब्रेथ अॅनालायझर मशिनने केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
आंबोलीत पर्यटन वाढले आहे. त्याचबरोबर मद्यपी पर्यटकांचा धांगडधिंगा होत असल्याने पर्यटनाला गालबोट लागते. या पार्श्वभूमीवर ऋषिकेश अधिकारी यांनी मद्यपी पर्यटकांना आवर घालण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीत दोषी आढळल्यास त्याच्यावर खटला दाखल केला जाणार आहे. शनिवार १५ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे. शनिवार व रविवारी आंबोलीत मुख्य धबधबा ते अन्य पर्यटनस्थळी मद्यपींवर खास पोलिसांची नजर राहणार आहे.
ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले की, आंबोली वर्षा पर्यटनाला गेले दोन आठवडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली आहे. आता दमदार पडणारा पाऊस आणि आंबोली घाटातील मोठ्या प्रवाहाने वाहणारे धबधबे यामुळे या आठवड्यापासून पुढील महिनाभर लाखो पर्यटक मोठ्या शहरातून
येणार आहेत. या आठवड्याच्या शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यामुळे कुठलाही धांगडधिंगा होऊ नये, यासाठी आम्ही मोहीम. हाती घेत आहोत. या मोहिमेत जवळपास अर्धा डझनहून अधिक पोलीस तैनात राहणार आहेत. तसेच आंबोली घाटात वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. मद्यपी पर्यटकांचा संशय आल्यास ब्रेथ अॅनालायझर मशीनने तपासणी केली जाणार आहे. आंबोलीत कुटुंबासह अनेक पर्यटक येतात. मात्र, धांगडधिंगा असेल तर त्यांना सुरक्षित वाटत नाही. पोलिसांच्या मोहिमेमुळे अशा पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. गेले. दोन आठवडे शनिवार व रविवारी आंबोलीत लाखाच्या घरात पर्यटकांनी हजेरी लावली. या शनिवार व रविवारीही उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच आंबोलीत बंदोबस्तात वाढ केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!