कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हॅल्मेट सक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जाचक दंडवसुली

*🟥परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हॅल्मेट सक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जाचक दंडवसुली*

*🟥मोटर वाहन कायद्यातील अन्य तरतुदी व नियमांना बगल देऊन फक्त हँल्मेटचे तुणतुणे वाजवणाऱ्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना मनसे जाब विचारणार*

*🟥आरटीओ कार्यालयाच्या असंवेदशील कारभारा विरोधात लवकरच “धडक” आंदोलन.. प्रसाद गावडे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.१४:* ओरोस आरटीओ कार्यालयात दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या जिल्ह्यातील सर्वसामान्य वाहनधारकांकडून हॅल्मेट सक्तीच्या नावाखाली जाचक दंड वसुली केली जात असून जनतेला निव्वळ त्रास देण्याचे काम सिंधुदुर्ग परिवहन विभागाकडून होत आहे.एकीकडे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे आरटीओच्या दलालांना मात्र कारवाईमधून सूट देण्यात येत असल्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत.हॅल्मेट वापराबाबत मोटार वाहन कायद्यातील तरतुदी दाखवून जनतेकडून जाचक वसुली करणारे आधिकारी त्याच अधिनियमातील इतर तरतुदींकडे दुर्लक्ष करत मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष का करतात व सामान्य जनतेची लूट करतात असा सवाल करत मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत आरटीओ कार्यालयाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. रस्ते निर्मिती करताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी न करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला “नियमावली” का शिकविली जात नाही, ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या व टीपी नसणाऱ्या परराज्यातील गाड्यांवर कारवाई का होत नाही, एजंटांना हाताशी धरल्याशिवाय जनतेची कार्यालयीन कामे का पूर्ण होत नाहीत, आरटीओ कार्यालयाच्या बाहेर सेवा दरपत्रक का प्रसिद्ध केले जात नाही, दुचाकीची विक्री करतानाच हॅल्मेट देणे नियमाधीन असताना शोरूम विक्रेत्यांकडून नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्याने आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही,वेंगुर्ले गुन्हा दाखल प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर परिवहन विभागाने कोणती प्रशासकीय कारवाई केली आदी प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,सिंधुदुर्ग कार्यालयावर “धडक” देणार असून वाहनधारकांनी देखील आरटीओ संबंधीत आपल्या व्यथा व गाऱ्हाणी मांडण्याचे आवाहन मनसेकडुन करण्यात येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!