आंबोली येथे निवासी शासकीय शाळा उभारणार- शिक्षण मंत्री दिपक केसरकर* * जमीन वाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही……. अर्धा टप्पा अजून शिल्लक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.१०जुलै:*
आंबोली येथील जमीन वाटप,ज्यावेळी वनखात्याच्या प्रश्न सुटेल त्याचवेळी प्रश्न सुटला असे म्हणता येईल,सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवला जाईल असे प्रतिपादन आंबोली माऊली मंदिर येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आंबोली माऊली मंदिर येथे कबुलयातदार प्रश्न सोडवल्याप्रकरणी आमदार मंत्री दिपक केसरकर यांचा सत्कार आंबोली माऊली मंदिरात ठेवण्यात आला होता. यावेळी शशिकांत गावडे,विशाल बांदेकर,श्रीकांत गावडे,बाळा गावडे(चौकुळ),जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील,शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी,नारायण राणे, सरपंच सावित्री पालेकर,राघोजी सावंत,दिनेश गावडे( चौकुळ)अनंत गावडे,संघर्ष समिती,ग्रामपंचायत सदस्य.आंबोली,चौकुळ, गेळे येथील ग्रामस्थ ,सर्कल गुरव तसेच ग्रामस्थ,महिला उपस्थित होते. यावेळी शशिकांत गावडे व श्रीकांत गावडे यांच्याहस्ते ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत गावडे म्हणाले कोणीही विरोध न करता एकमताने निर्णय घेऊया.आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढे करावे.वनखात्याकडची जमिनीचा प्रश्न सोडवावा.आंबोलीत बाहेरच्या लोकांनी घरे बांधली आहेत जागा घेतल्या आहेत.त्यामुळे इथे जमीन वाटताना वादंग होणार आहेत.तरी सर्वाना सामावून घेऊन हा प्रश्न सोडवावा.हा प्रश्न सोडवण्याचे श्रेय हे युती असल्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण,राजन तेली,दीपक केसरकर या तिघांचेही आहे.यावेळी मंत्री ना.दीपक केसरकर म्हणाले,महाराष्ट्रत 45 हजार हेक्टर फॉरेस्ट आहे मात्र त्यातील सिंधुदुर्गात 42 हजार हेक्टर वर वन लागले आहे.सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार वनसदृश्य जमीन ही खाजगी जमिनी प्रमाणे विकता येते सर्व व्यवहार करता येतात.सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आहेत.जिल्हा कमिटी मध्ये आपण तसेच प्रांत तहसीलदार,मुख्यकार्यकारी अधिकारी असे सगळे मिळून एक नियोजन तिन्ही गावासाठी करण्यात येणार आहे. चौकुळ ग्रामस्थांची मीटिंग पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.गेळ्यातील लोकांचे वाटप त्यांच्या म्हणण्यानुसार ठरणार आहे. चौकुळ च्या लोकांनी आपल्याला कसा प्रश्न सोडवायचा आहे ते सांगावे त्याप्रमाणे सोडवू. 75 कुटुंब बाहेरून येऊन इथे स्थायिक झाल्याने त्याना फक्त घरासाठी जागा मिळेल. वनखात्याचा प्रश्न अजून सुटायचा आहे त्यामुळे हा अर्धा प्रश्न सुटला. अडीज वर्षांपूर्वी आपण स्टे उठवण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे केली पण उठवला नाही असे मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.त्यानंतर आंबोली माऊली मंदिर बहुउद्देशीय सभागृह मंजूर करण्यात आले असून त्याचे भूमिपूजन नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. माऊली मंदिरात सत्कार स्वीकारण्यापूर्वी दीपक केसरकर यांनी गेळे येथे भेट देत बाळेभाटले प्राथमिक शाळेच्या शासकीय जागेची पाहणी केली व या ठिकाणी निवासी शाळा बांधण्याचे आपले स्वप्न असून शासकीय निधी तून त्या ठिकाणी ५०० मुलांची शाळा बांधण्यासाठी.९ हेक्टर जागा आरक्षित करून लवकरच काम सुरू करण्यात येईल व ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल .महाराष्ट्रात सध्या सर्वात मोठी 30 हजार शिक्षक भरती झाली आहे हायकोर्टाने स्थगिती दिल्याने नेमणूक मिळालेली नाही.असे दीपक केसरकर म्हणाले, जकातवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. मुलांशी संवाद साधला. अनेक देशात यांची स्वतः ची भाषा आहे.त्यांची प्रगती आहे त्यामुळे मराठी भाषेला आपण तेवढंच महत्व दिले पाहिजे.परदेशात शिकण्यासाठी देखील शासनाच्या विविध सवलती आहेत.यावेळी माध्यमिक शाळेसाठी मुलांसाठी शौचालय नसल्याबाबत लक्ष वेधल्यानंतर या ठिकाणी आपण शौचालय मजूर करत असल्याचे सांगितले. त्यानंतर आंबोली येथील सैनिक स्कूल ला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी दीपक केसरकर यांनी संवाद साधला यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य ऋषिकेश गावडे संचालक सुनील राऊत यांनी दीपक केसरकर यांचे स्वागत केले .यावेळीं मुख्याध्यापक अनिल चाळूचे, हौसा गवस, तसेच हायस्कूलचे शिक्षक डी पी सावंत, श्री.मोरे,बाळा गावडे सरपंच सावित्री पालेकर,प्रांत प्रशांत पाणवेकर उपस्थित होते .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

