कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कारिवडे गोसावी टेंब येथील सिध्द महापुरुषांच्या मंदिरातील त्रिशुळाची विटंबना,गणपत गोसावी याच्यावर गुन्हा दाखल

सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे गोसावी टेंब येथील जागृत देवस्थान श्री देव सिध्दमहापुरुष मंदिरातील पाषाण रुपी कोल घेतला जाणार त्रिशूळ आडदांड,व दांडगाईने मंदिरात प्रवेश करुन तेथील मानकरी बाबा बुवा यांच्या गालाचा चावा घेऊन, त्रिशूळ वाकवून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गणपत रामा गोसावी याच्यावर भादवी कलम ३२३,३२४,५०४,४२७,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कारिवडे गोसावी टेंब येथे सिध्द महापुरषाचे समाधी मंदिर आहे,हे सावंतवाडी तालुक्यातील एक जागृत देवस्थान असून अनेक भक्तगणांना त्याचा अनुभव आल्याने भक्तांची गर्दी वाढत असते, तेथील बुवा बाबा गोसावी त्रिशूळाला कोल लावून अनेक भाविकांची समस्या सोडवत असतात असेच काल देवळात असताना, संध्याकाळी सात च्या सुमारास गणपत गोसावी याने कोणतेही कारन नसताना मंदिरात भाविक उपस्थित असताना बाबा बुवा गोसावी यांना मारहाण करून ज्या त्रिशूळाला कौल लावले जातात तो वकवून संपूर्ण गोसावी समाज व कारिवडे ग्रामस्थ तेसचे जिल्हाभरातील भावीक यांच्या भावना दुखावल्या आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून गणपत गोसावी याला ताब्यात घेतले आहे,अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!