सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले बॅ. नाथ पै फिजीओथेरपी महाविद्यालय सुरू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०२: येथील बँ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग या शिक्षण संस्थेला सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून बँ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजीओथेरपी महाविद्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू होणारे हे पहिले फिजीओथेरपी (भौतिकोपचार) महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय या जिल्ह्यात आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात भर पडली आहे. बँ. नाथ पै शिक्षण संस्था शैक्षणिक कार्य करताना नेहमी पुढील काळ ओळखून नवीन अभ्यासक्रम सुरू करत असते.
या महाविद्यालयास मान्यता मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख, खासदार विनायक राऊत, माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत, आमदार वैभव नाईक यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल संस्थेच्यावतीने सर्वांचे आभार बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी मानले.
कोरोना नंतरचा काळ तसेच सद्यस्थितीत समाजाची जीवनपद्धती लक्षात घेता मोठया प्रमाणात फिजिओथेरपिस्ट ची आवश्यक आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सदरील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थिनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन प्रेफरन्स फॉर्म भरताना ६१५५ हा कॉलेज कोड निवडावा. तसेच याबाबत काही समस्या असल्यास ०२३६२-२२२८८९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

