*सावंतवाडी एस टी स्थानकाच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण?माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा सवाल
*सावंतवाडी एस टी स्थानकाच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण?माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा सवाल*
*सावंतवाडीच्या विकासाच्या वल्गना करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी एसटी स्थानकात पावसात पायी फिरून दाखवावे*
तत्कालीन पालकमंत्री व सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या आठ मुठ्या धोरणाने व मतदार संघावर लक्ष नसल्यामुळे सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले राज्य परिवहन मंडळाचे आगार पाच वर्षे झाली तरी बांधून पूर्ण झाले नाही, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन स्वतःचे परिधान केलेले कपडे सांभाळत या आगारांमध्ये प्रवेश करावा लागत आहे, तर एसटी चालकांनाही कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत, या सर्व घटनेला जबाबदार कोण असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विचारला आहे.
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले एसटी आगार राज्यातील इतर आजारांप्रमाणे नवीन इमारत बांधण्याच्या नावाखाली पाडण्यात आले,जिल्ह्यातील इतर आगाराची कामे पूर्ण झालीत, मात्र दीपक केसरकर आमदार व मंत्री असलेल्या सावंतवाडी शहराच्या आगाराचेकाम सुरुवातीपासूनच रखडले, गेली पाच वर्षे या आगाराचे काम रखडलेले आहे,शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर या आगाराच्या पूर्णतेबाबत वेगवेगळी भाषा करून लोकांना गंडविण्याचे काम करत आहेत, प्रवासही हतबल झाले आहेत, या संपूर्ण आगारात चिखलाचे साम्राज्य व छोटी छोटी पाण्याची डबकी तयार झाली आहेत याला जबाबदार कोण? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
सावंतवाडी आपली कर्मभूमी आहे या सावंतवाडीने आपल्याला भरपूर काही दिले, त्या सावंतवाडीच्या ऋणातून मी कधीच उत्तरदायी होऊ शकत नाही असे भावनिक भाषण करून जनतेला गंडविण्याचे काम आजतागायत केसरकर यांनी केले, आता तरी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या आगाराच्या बाबत जनतेला उत्तर द्यावे असे बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.

