फ्रिज चोरीच्या आरोपातून निर्दोष
फ्रिज चोरीच्या आरोपातून निर्दोष
सावंतवाडी
बांदा येथील सावंत कोल्ड्रिंकमधील फ्रिज आतील मालासह चोरून नेल्याच्या आरोपातून तळवडे (ता. सावंतवाडी) येथील समीर काजरेकर याची होता. सावंतवाडी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याबाबत अधिक माहिती अशी की, १५ मार्च २०१७ रोजी बांदा येथील व्यापारी नीलेश सावंत हे आपले बांदा-दोडामार्ग रस्त्यालगत असलेले दुकान रात्री बंद करून घरी गेले असता त्यांच्या दुकानाच्या बाहेर असलेला मोठा फ्रिज कोणीतरी
अज्ञात व्यक्तीने चोरून नेला होता. संशयावरून समीर काजरेकर याला पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला फ्रिजदेखील हस्तगत केला मात्र, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याबाबतचे ठोस पुरावे जमा करण्यात पोलीस अपयशी ठरल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाल्याने आरोपी समीर काजरेकर याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. अनिल केसरकर यांनी काम पाहिले.

