महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी साळुंखे यांनी शिंदे शिवसेना गटांच्या शाखा प्रमुखा सारखे वागू नये -माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी साळुंखे यांनी शिंदे शिवसेना गटांच्या शाखा प्रमुखा सारखे वागू नये -माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी शहराचे निरपेक्ष हेतूने गेली प़चविस वर्षे काम केले, सावंतवाडी शहराचा नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली म्हणूनच जनता अजूनही त्याच विश्वासाने आमच्या कडे आपले काम घेऊन येतात,त्यांचे काम मुख्याधिकारी साळु़खे यांना फोन करून पाठवले असता त्यांना तुम्ही तुमच्या कामात राजकारण आणू नका असे मुख्याधिकारी सांगत असतील तर त्यांनी प्रथम आमच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करावा अन्यथा साळुंखे यांना आमच्या कामाची पध्दत कशी आहे ते दाखवून द्यावे लागेल,त्यांनी शिंदे शिवसेनेचे शाखा प्रमुख असल्या गत वागू नये असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.
लोक आमच्याकडे काम घेऊन येतात याचं कारण नगरपरिषदेमध्ये होत असलेला विलंब सावंतवाडीतील नागरिक सुजाण आहेत,आपल्या कडे अधिकार आहेत म्हणून लोकांचा अपमान करू नका, एका छोट्या घरासाठी डेव्हलपमेंट चार्जेस भरूनही दोन दोन महिने परवानगी हातात मिळत नाही याचा अर्थ काय? या कामासाठी आम्ही जर फोन लावला तर तुम्हाला राजकारण वाटतं वैयक्तिक घरांची परवानगीचा काम होणार नाही तर काय बिल्डर्सच्या कामासाठी तिथे मलिदा बसलाय काय असा सवाल केला आहे.
लोक आमच्याकडे विश्वासाने येतात कारण आमच्याकडून काम होतील हा आमच्यावरील असलेला त्यांचा विश्वास आहे गेले 25 वर्षे या नगर परिषदेमध्ये मध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे, त्यातील साडेचार वर्ष उपनगराध्यक्ष तसेच पुढील आठ वर्ष नगराध्यक्ष म्हणून या शहराचा कारभार सांभाळला आहे, चुकीचं काम करा म्हणून आम्ही कुठच्याही अधिकाऱ्यावरती आज तगायत दबाव टाकलेला नाही, जनतेच्या कामासाठी हजार वेळा फोन करू नियमात असलेली काम वेळेत होणे हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे, आम्ही सांगितलं काम नियमात आहे,आम्हाला निष्पक्षपाती कामाची तुमच्याकडून अपेक्षा आहे,प्रत्येक अभ्यंगतांच काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे, आम्ही पाठवलेल्या अभ्यंगतांचा अपमान हा आमचा अपमान आम्ही समजू अपमान कधीही सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे.
निष्पक्ष काम करा, कुणाचेही शाखाप्रमुख म्हणून काम करू नका उद्या नगरपरिषदेमध्ये आमचीही सत्ता असू शकते, मंत्रीच म्हणत असाल तर आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री आमचे मीत्र आहेत तसेच केंद्र मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री अत्यंत जवळचे आहेत, अनेक मुख्याधिकारी आमच्या कारकिदीमध्ये मध्ये होऊन गेलेत त्यांच्याकडे आमच्या कामाची जरा चौकशी करा जास्त खोलात जाऊ नका आंदोलन करून आमचं नेतृत्व उभे राहिले आहे,तुम्ही कार्यभार सांभाळल्यानंतर शहराच्या दुरावस्थेत j भर पडलेली आहे कुठचाही धोरणात्मक निर्णय तुम्ही खुर्चीत बसल्या नंतर घेऊ शकलेला नाहीत, शहरांमध्ये ठिकाणी कचरा साठलेला दिसत आहे, नालेसफाई एक महिना होऊन गेला तरी जैसे थे आहे नालेसफाई ,गटार सफाई, झालेली नाही आपत्कालीन कक्षामध्ये कोणीही नसतं ,कार्यालयीन व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकलेला नाहीत हे तुमचं अपयश आहे अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
फार जास्त खोलात जात नाही असा संताप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!