🟥 मडुरा – शेर्ले मार्गावरील मारुती मंदिर नजीक महाराष्ट्र प्राधिकरणची पाइपलाइनसाठीची खोदाई धोकादायक..
*🟥 भविष्यात जीवित हानी झाल्यास बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदार सर्वस्वी जबाबदार ; मडुरा उपसरपंच बाळू गावडे*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२६:-* मडुरा-शेर्ले मार्गावरील मारुती मंदिर नजीक असलेल्या पुलाच्या बाजुने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाईपलाईन टाकण्यासाठी दुर्घटना घडण्यासारखी खोदाई केली आहे.परिणामी एका बाजूने पुलाचा भराव कोसळत असून पूल समांतर संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे.पावसाळा सुरू झाला तरी ठेकेदार याकडे गांभीरतेने लक्ष देत नाही. त्यामुळे अशा ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे, असा सवाल करत भविष्यात पुलावर जीवित हानी झाल्यास अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा,भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा हनुमान मंदिराजवळ असलेले पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. बांद्याच्या दिशेने उजव्या बाजूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने काम करताना पुलाच्या एका बाजूस धोका निर्माण केला आहे. बेशिस्त नियोजन आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना भविष्यातील समस्या उभी करून ठेवली आहे. पाईपलाईनच्या बाजूने संपूर्ण संरक्षक भिंत काँक्रिटीकरण करण्याची वारंवार मागणी आम्ही केली. परंतु याकडे बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले. भविष्यात पूल कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार राहतील, असे बाळू गावडे यांनी सांगितले.
ठेकेदाराने चार दिवसात पुलाला समांतर संरक्षक भिंत उभी न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचक्रोशीतील समस्त नागरिकांना घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेराव घालणार असल्याचा इशारा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

