आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 दापोलीमध्ये भीषण अपघात, मृतांची संख्या पाचवरून आठवर पोहोचली!

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-२६:-* रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत.आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना तीन जणांचा उशिरा रात्री मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

दापोली हर्णे मार्गांवरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनिल (बॉबी) हे त्यांचे मॅजिक प्रवासी रिक्षा ( एम. एच.08.5208) हे दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी घेऊन जात असताना त्यांची वाहन आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आले. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारला. तेव्हा मॅजिक प्रवासी रिक्षा जोरदार ट्रकवर आदळली. ट्रकने प्रवासी रिक्षाला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. हा अपघात एवढा भयानक होता की प्रवासी रिक्षामधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

चालकासह क्लीनरला अटकअपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात अनिल सारंग चालक वय 45 रा. हर्णे, संदेश कदम 55, स्वरा संदेश कदम, 8, मारियम काझी, 64, फराह काझी, 27 सर्व रा. अडखळ यांचा मृत्यू झाला आहे. तर वंदना चोगले (वय 34 रा. पाजपंढरी) ,व मीरा बोरकर (वय 22, रा. पाडले) यांचे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले, तर सामीया इरफान शिरगांवकर हिचेही निधन झाले आहे. त्यामुळे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सपना संदेश कदम वय 34, रा. अडखळ, श्रद्धा संदेश कदम, वय 14, रा. अडखळ, विनायक आशा चोगले, रा. पाजपंढरी, भूमी सावंत वय 17, मुग्धा सावंत वय 14, ज्योती चोगले वय 9 रा. पाजपंढरी यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच अडखळ, हर्णे, पाजपंढरी तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघात स्थळावरून पळ काढला. दापोली पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

चालकाचाही मृत्यू : अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातात प्रवासी मॅजिक गाडीचे चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचा मृत्यू झाला आहे. ते हर्णै गावचे रहिवासी होती. अपघातातील सर्व लोक अंजरले, पाजपंढरी, अडखळ या गावातील असल्याचे कळाले आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी, या अपघातात ट्रक चालकाची चुकी होती, असा अंदाज लावण्यात आला आहे.

 

जखमी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल : या अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी स्थानिकांसह येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. काही जखमी प्रवाशांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – मरियम गौफिक काझी, वय 6 वर्षे, स्वरा संदेश कदम, वय 8 वर्षे, संदेश कदम, वय 55 वर्षे, अनिल सारंग, वय 45 वर्षे, फराह तौफिक काझी, वय 27 वर्षे. हे सर्व अडखळ गावचे रहिवासी आहेत.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!