कोल्हापूरक्राइममहाराष्ट्रसामाजिक

🟥 पोलीस तक्रारीत नाव घातल्याचा रागातून गावच्या पोलिस पाटलाचाच निर्घृण खून ; कोयता, खुरप्याने सपासप वार..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴चंदगड, दि-२६:-* कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी गावामध्ये गावच्या पोलीस पाटलांचाच गावातील चार जणांनी पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जुन्या वादात पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागात कोयता आणि खुरप्याने सपासप वार करुन पोलिस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील (वय 41) यांचा चार जणांनी खून केला. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस पाटील संदीप यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातील वादावरून देवाची रांगी नावाच्या शेतात शनिवारी संशयित आरोपी रोहित पाटीलशी वाद झाल्यानंतर त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव यांनी फोन करून पोलिस पाटील संदीप यांना बोलावून घेतले होते. यानंतर पोलिस पाटील संदीप गुरव यांच्या देवाचे रांगी नावाच्या शेतात गेले. यावेळी रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरुण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील (सर्व रा. पोहाचीवाडी) यांनी पूर्ववैमनस्यातून पोलिस तक्रारीत नाव घातल्याचा रागातून पोलिस पाटील यांच्यावर कोयता, खुरप्याने हातावर, डोक्यात मानेवर सपासप वार केले. यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) यांच्या तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. यामध्ये रोहित व भावकीतील काही जणांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यामध्ये पोलिस पाटील संदीप यांनी तक्रारीमध्ये नाव घातल्याचा राग होता. त्या रागातून हा खून झाल्याचे समोर येत आहे.

 

पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार

 

दरम्यान, आठवडाभरापूर्वी भरदिवसा थेट पोलिस ठाण्यासमोर तरुणावर कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात घडली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. अभिषेक बजरंग खांडेकर (वय 21) हा गंभीर जखमी झाला आहे. विमल प्रकाश पाटील (वय 65) याही जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकवर इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी आणि अजय जुवे (रा. गोसावी गल्ली) यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!