मालवणशैक्षणिकसिंधुदुर्ग

गाबित दाखल्यासाठी तारकर्लीतील विद्यार्थिनीकडून गृहचौकशीची मागणी

गाबित दाखल्यासाठी तारकर्लीतील विद्यार्थिनीकडून गृहचौकशीची मागणी

मालवण

दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी धावपळ करताना दिसत आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांसाठी शासकीय दरबारी प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांची होता. लगबग सुरू आहे. मात्र, गाबित ज्ञातीतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जातीचा दाखला मिळविताना तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून तारकर्लीतील भाग्यश्री रमाकांत मालंडकर या विद्यार्थिनीनेच गृहचौकशीची मागणी या केली आहे. त्यानुसार मालवण आहे.. तहसील कार्यालयाकडून संबंधित तलाठ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मालंडकर हिने ४ जुलै २०२२ रोजी जातीच्या दाखल्यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, ‘दाखलाधारक आणि वडिलांच्या जातीमध्ये तफावत’ असल्याचा शेरा मारून हा प्रस्ताव नाकारण्यात आला

वडिलांच्या जातीच्या दाखल्यावर ‘हिंदू-मराठा’ असा उल्लेख असला, तरी आपल्या शाळेच्या दाखल्यावर ‘हिंदू-गाबित’ असा उल्लेख आहे, आम्ही स्वत:ला गाबितच मानतो आणि आम्ही गाबितच आहोत, असे विद्यार्थिनीचे म्हणणे

यासंदर्भातील निवेदन तिने तहसील कार्यालयाला सादर करत जातीच्या दाखल्यासाठी गृहचौकशीची मागणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!