कृषिमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

भुईमूग, नाचणी पिकाचा हंगाम लांबल्याने चिंता

भुईमूग, नाचणी पिकाचा हंगाम लांबल्याने चिंता

बागायत

गेली काही वर्षे जिल्ह्यात वेळेत पाऊस पडत असल्याने शेतीची कामे मे महिन्यापासूनच सुरू होत होती. यावर्षी जून महिना संपत आला, तरी पावसाचे चिन्ह दिसत नसल्याने ग्रामीण भागात भात बी पेरणी खोळंबली आहे. शेतीच्या हंगामाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे मे महिन्यात जमिनीची भिजवणी करून भात बी पेरणी केली जाते. काही ठिकाणी पाण्याची गैरसोय व पुरवठा कमी असल्याने साधारण जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर भिजवणी झाल्यावर भात बी पेरतात. यावेळी । काही भागात मे महिन्यातच बी पेरणी करून सध्या भात रोपे : लावणीयोग्य झाली आहेत. तर काही भागात निसर्गातील बदलामुळे जून महिना संपत आला, तरी पाऊस नसल्याने शेतकरी भात पेरणी करू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतीच्या हंगामास उशीर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातशेती बरोबरच जिल्ह्यात भुईमूग, नाचणी इत्यादी पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु यावर्षी पावसाअभावी याही पिकांचा हंगाम लांबत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!