🟥’इ स्टोर इंडिया’ विरोधात देवगडला मोर्चा
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.२०:* तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यत बचतगटांच्या महिलांना व्यवसायासाठी एका बँकेतून कर्ज काढून ते ई-स्टोअर इंडिया या कंपनीत गुंतवणूक करण्यास कंपनीच्या स्थानिक एजंटांनी भाग पाडले. ई-स्टोअर इंडिया ही कंपनी बंद पडल्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कंपनीवर योग्य कारवाई करावी. तसेच कर्ज फेडण्यासाठी त्या बँकेने महिलांना त्रास देण्यास सुरुवात केली असून वसुली प्रतिनिधींकडून महिलांना धमकावण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी देवगड तालुका मनसेच्यावतीने सोमवारी देवगड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढून करण्यात आली. देवगड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी देवगड पोलीसठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला. या
मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष महेश नलावडे, संपर्क अध्यक्ष संतोष मयेकर, बबलू परब, सचिव जगदीश जाधव, शहर अध्यक्ष सचिन राणे, मनविसे तालुकाध्यक्ष राकेश मिराशी, कातवन विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर, शाखाध्यक्ष गणेश खोत, कट्टा शाखाध्यक्ष विराज जावकर, ” महाराष्ट्र सैनिक अमित जाधव, अभिजित गावकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा खवळे तसेच मनसे देवगड महिला आघाडीच्या स्वरा करंगुटकर, अर्पिता राघव, योगिता खोत, अनुश्री तावडे, सुहासिनी प्रभू, रोहिणी चव्हाण, राजश्री लाड, संचिता घाडी यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. ई-स्टोअर इंडिया या कंपनीमध्ये महिलांनी गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडून आता परतीचे पैसे मिळत नाहीत. कंपनीच्या एजंटांकडे मागणी केली असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची योग्य उत्तरे मिळत नाहीत. या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एजंटांनी महिलांना प्रवृत्त केले आहे. आता कंपनी बंद पडल्यावर एजंट मोकाट फिरत आहेत. कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी एजंटांनी एका व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या परराज्यातील बँकेकडून महिलांना कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

