राज ठाकरेंच्या वाढदिनी मनसेकडून कार्यक्रमांचा धडाका
*राज ठाकरेंच्या वाढदिनी मनसेकडून कार्यक्रमांचा धडाका*
*पिंगुळी येथे बस पीक अप शेडचे उद्धाटन, नेरूर मध्ये महिलांना वृक्ष वाटप तर हळदीचे नेरूर येथे सोलर स्ट्रीट लाइटचे लोकार्पण*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
आज दिनांक 14 जून 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून कुडाळ मनसेकडून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले पिंगुळी येथील प्रसिद्ध वड गणेश मंदिर येथे राज साहेब ठाकरे यांना आगामी काळात उत्तुंग यश लाभो अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली वड गणेश मंदिर समोर उन्हातान्हात उभे राहणारे प्रवाशांसाठी बस स्टॉप पिकप शेडचे उद्घाटन मनसे सरचिटणीस परशुराम परकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे हळदीचे नेहरू येथे सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करण्यात आले त्याचप्रमाणे नेरूर गोंधीयाळे हे येथील बचत गटाच्या महिलांना चाफा,आवळा,रक्तचंदन, कोकम,काजू,साग या वृक्षांचे वाटप करण्यात येऊन पर्यावरण संतुलनासाठी प्रबोधन करण्यात आले. पुढील तीन दिवस मनसेकडून तालुक्यातील नाक्या नाक्यांवर वृक्ष वाटप करण्यात येणार आहे.यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,बाबल गावडे, राजेश टंगसाळी,दिपक गावडे,आपा मांजरेकर,अमोल जंगले,जगन्नाथ गावडे,वैभव धुरी,गजानन राऊळ,सागर सावंत,रामा सावंत,सत्यविजय कविटकर यासंह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

