🟥 संशयिताकडून ओसरगाव येथील चोरीचीही कबुली
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१६:-* स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस गस्त घालत असताना संशयास्पदरित्या आढळलेला व ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर कणकवली तालुक्यातील जानवली येथे झालेल्या घरफोडीची कबुली देणारा चोरटा शंकर नवलप्पा पवार (६०, रा. सोलापूर) सध्या कणकवली पोलिसांच्या कोठडीत आहे. दरम्यान शंकर याने ओसरगांव येथे १३ एप्रिलला झालेली घरफोडीही आपणच केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे शंकर याचा जिल्ह्यातील आणखीही काही घरफोड्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याची माहिती तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली आहे.
ही कारवाई एलसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री महामार्गावरील हॉटेल रिलॅक्सनजीक केली होती.

