🟥 16 ते 22 जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन !
🟥 भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’शिवाय पर्याय नाही ; श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१३:-* गोवा येथे गेल्या 11 वर्षांपासून होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात इस्लामिक स्टेटच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस-प्रशासनाला आव्हान देत आहेत, हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत; तर मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेला नाही. देशभरात साक्षी, अनुराधा, श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदू मुलींच्या ‘लव्ह जिहादीं’कडून होणार्या निर्घृण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, असे दिसते. ‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ ‘केरळ’ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. एकीकडे हिंदूंनी भाषण केले की, लगेचच त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा दाखल केला जातो; मात्र ‘सर तन से जुदा’ करण्याच्या उघड घोषणा देणार्यांवर कारवाई होतांना दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘आय.एस्.आय.एस्.’ हे भारताला वर्ष 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो समाजाला जोडू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, समितीचे श्री गोरक्षक श्री. स्वागत नाटेकर, सनातन संस्थेचे श्री. शंकर निकम, आणि हेही उपस्थित होते.
या वेळी सनातन संस्थेचे श्री.शंकर निकम म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील तज्ञ मंडळींचे परिसंवाद, तसेच विशेष कार्य करणार्या मान्यवरांच्या मुलाखती हेही यंदाच्या अधिवेशनाचे विशेष आकर्षण असणार आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्या’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’, ‘मंदिर संस्कृतीचे रक्षण’, ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’, ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.
यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अमरावती येथील ‘श्री रुक्मिणी वल्लभ पिठा’चे अनंत विभूषित श्री जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी रामराजेश्वराचार्यजी सरकारजी, ‘विश्व हिंदु परिषदे’चे देवगिरी प्रांताचे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे स्वामी चित्तरंजन महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, छत्तीसगड येथील ‘श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान’चे संचालक श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, गोंदिया येथील ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.
याशिवाय प्रामुख्याने काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ट आमदार टी. राजासिंह, माजी आमदार तथा ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच आपल्या जिल्ह्यातील गोरक्षक श्री स्वागत नाटेकर आणि वेदमूर्ती श्री. भूषण जोशी हेही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती समितीचे श्री हेमंत मनेरिकर यांनी दिली.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

