कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

खैरतोड प्रकरणातील एकाचा जामीन फेटाळला

खैरतोड प्रकरणातील एकाचा जामीन फेटाळला

सावंतवाडी

डेगवे येथील शासकीय जंगलात खैरतोड करून घटनास्थळावरून वनाधिकाऱ्यांना चकवा देऊन पसार झालेल्या सुदिन श्रीराम आगरवडेकर (१९, रा. तळवडे, ता. सावंतवाडी) याने अटकपूर्व जामिनासाठी ओरोस रोजी येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.

सुदिन श्रीराम आगरवडेकर व त्याचे अन्य दोन साथीदार यांना डेगवे येथील शासकीय जंगलात कटरच्या सहाय्याने तोड करून खैर वाहतूक करताना पकडण्यासाठी वनविभागाकडून सापळा लावण्यात आला. १८ मे रोजी या तिघांपैकी एक साथीदार महेश कुडव (१८, रा. इन्सुली) याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर अन्य दोघे पसार झाले. त्यापैकी मंथन आईर हा २४ मे स्वत:हून वनाधिकारी यांच्यासमक्ष तपासात सहकार्य करण्यासाठी हजर झाला. परंतु दुसरा संशयित सुदिन आगरवडेकर हा आजतागायत सापडलेला नाही. त्याने ओरोस सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्याधीशांनी फेटाळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!