आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥 चौकुळ आंबोली रस्त्याला पावसाळ्यापूर्वी कॅट आय रिफ्लेक्टर बसवल्याने ग्रामस्थांनी केले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक…..* *🟥 अधीक्षक अभियंता अनामिका चव्हाण व शाखा अभियंता विजय चव्हाण यांची भेट घेत ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले….*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

*🎴 सिंधुदुर्ग, दि.१०जून:
आंबोली चौकुळ रस्त्याला दोन्ही बाजूने कॅट आय रेडियम रिफ्लेक्टर लावल्याने चौकुळ ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुके असते. या रस्त्यावर पर्यटकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. चौकुळ येथील अनेक युवक आंबोली घाटात पावसाळ्यात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी येत असतात. दिवसभर आपला व्यवसाय करून रात्री घरी जात असताना धुक्याचा प्रचंड सामना करावा लागतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात राखीव वनक्षेत्र असल्याने जंगली प्राण्यांची प्रचंड वर्दळ असते . धुक्यात रात्री च्या वेळी वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज अजिबात येत नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. हि अडचण लक्षात घेता चौकुळ चे माजी सरपंच विजय गावडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री यांनी वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देत आंबोली ते चौकुळ या रस्त्याला दोन्ही बाजूला रात्रीच्या वेळी रस्त्याची बाजू समजण्यासाठी रेडियम कॅट आय रिफ्लेक्टर बसवण्यासाठी मागणी केली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अनामिका चव्हाण शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी या मागणीकडे गंभीरतापूर्वक लक्ष देऊन निधी मंजूर करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे रिफ्लेक्टर बसवले. सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यांच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नेहमीच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र काही अधिकारी आपल्या पदाचा व अधिकाराचा सदुपयोग करत सामाजिक भान राखत सामान्य नागरिकाला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचे व शासकीय विभागाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी सतत झटत असतात याचे उदाहरण म्हणजे अनामिका चव्हाण व शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी केलेले हे काम….. यासाठी चौकुळ ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता अनामिका चव्हाण व शाखा अभियंता विजय चव्हाण यांची कार्यालयात भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नेहमीच उपोषणाची व तक्रारींची निवेदने स्वीकारणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केलेल्या अभिनंदनामुळे सुखद धक्का बसला. यावेळी अभिजित मेस्त्री, राजाराम गावडे, सिताराम गावडे, जगी गावडे ,गंगाराम गावडे ,सुनील मेस्त्री, आकाश मेस्त्री, भाई गवस व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!