घाबरु नका! मी तुमच्या पाठीशी आहे; दत्तात्रय नलावडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.३०: एस.एम. प्रशालेचे माजी विद्यार्थी आज कलेक्टर, सरन्यायाधीस, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायीक आणि उद्योजक देशात आणि जगभरात चमकत आहेत, हे सर्व श्रेय कणकवली शिक्षण संस्थेचे, पर्यायाने गुरुजनांचे आहे. नोकरी आणि व्यवसाय करताना ते करत असलेल्या सामाजिक कामांध्ये माझा त्यांना नेहमीच सहकार्य आणि पाठींबा राहील. सरळ आणि निपक्षपातीपणे कार्य करत असताना घाबरु नका! मी तुमच्या सतत पाठीशी असणार असे उद्गार कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव नलावडे यांनी केले.
श्री. दत्तात्रय नलावडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाची दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर, अॅड. सावंत उमेश, डॉ. योगेश महाडिक, मीनल नार्वेकर खजिनदार, मुख्याध्यापक श्री. पोतदार, माजी मुख्याध्यापक श्री. माळी, पत्रकार विनोद जाधव, शिक्षिका अश्वीनी जाधव, नलावडे कुटुंबीय, महाडेश्वर कुटुंबीय, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इ उपस्थित होते.
एस.एम. प्रशालेत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी श्री. देसाई हे कोल्हापुर येथे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच याच शाळेतील सुरेंद्र तावडे आज मुंबई येथे सरन्यायाधीश म्हणुन काम करत आहेत, तर उमेश उमेश सावंत आपल्या जिल्ह्यात एक चांगले वकील म्हणुन काम करत आहेत. असे सांगुन ते पुढे म्हणाले, की आज यशस्वी झालेल्या या मान्यवरांनी त्यांच्या विद्यार्थी काळात अपार कष्ट घेतले, कुठल्या गोष्टीची लाज वाटुन घेतली नाही म्हणुन आज त्या पदाला पोहचले आहेत, हा त्यांचा आदर्श विद्यार्थींनी ठेवणे गरजेचे आहे. आपल्याविषयी स्वभावाविषयी बोलताना ते म्हणाले माझा स्वभाव नारळाप्रमाणे वरुन टनक आणि आतुन मधुर असा आहे. माझ्याकडे कामानिमित्त येणार्या लोकांचा चेहरा पाहुन मला त्यांच्या मनात काय हेतु आहे ते ओळखणे ही ईश्वरी देणगी मला मिळाली आहे. मला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे, असे ते म्हणाले.
अॅड. उमेश सावंत म्हणाले, सामाजिक सेवा करणार्यासाठी नलावडे यांचे व्यक्तीमत्व दुमिर्ळ आदर्श आहे. पु.ल. देशपांडे यांना नलावडे भेटले असते तर बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तीमत्व असे नवीन पात्र व्यक्ती आणि वल्ली नलावडे यांच्या रुपाने समाविष्ट झाले असते.
कार्यक्रमात डॉ. योगेश महाडिक माजी मुख्याध्यापक माळी, खजिनदार मीनल नार्वेकर, मुख्याध्यापक पोतदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मसुरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_