कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कणकवली

महावितरणच्या भरारी पथकाने मालवण तालुक्यातील नांदरुखमधील दोघांवर, तर माळगावमधील दोघांवर वीजचोरी केल्याप्रकरणी कारवाई केली. या प्रकरणी कणकवली पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरणमध्ये कुडाळ विभागात ज्ञानोबा सदाशिव बंडगर (४४) हे उपकार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे वीज चोरी व अनधिकृत वीज वापर शोधून

त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे काम आहे. १४ एप्रिल रोजी बंडगर व विक्रम साव, फराज सय्यद, सोनाली गिरीकर, गुरुदास सावंत हे पथक नांदरुख गेले असता अरुण गोविंद चव्हाण व रामचंद्र गोविंद चव्हाण यांचा मीटर चेक केला तेव्हा मीटरमध्ये छेडछाड करून त्यांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले. चव्हाण यांनी मे २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत ६१५५२ युनिटची (१० राजेंद्र लाख ८८ हजार, ५०२) रुपयांची वीज चोरी केली. तडजोडीपैकी त्यांनी

३ लाख २८ हजार ८०५ रुपयांची भरणा केली. मात्र, ७ लाख ६० हजार रुपयांचा भरणा न केल्यामुळे ज्ञानोबा सदाशिव बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

बंडगर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक ११ मे २०२३ रोजी मालवण तालुक्यातील माळगाव येथे ‘गेले असता राजेंद्र सुरबा चव्हाण व सागर चव्हाण यांनी मीटरची तपासणी केली असता त्यांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!