वेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

एसटी बसस्थानकांना पुष्कराज कोलेंकडून आज व्हिलचेअर

एसटी बसस्थानकांना पुष्कराज कोलेंकडून आज व्हिलचेअर

वेंगुर्ले

वेंगुर्ल्याचे सुपुत्र व रोटरी क्लब ऑफ मुंबईचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले यांच्या संकल्पनेतून अपंग व ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी डेपोंना मोफत व्हिलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ डेपो येथे होणार आहे. कुडाळ, कणकवली, मालवण, दोडामार्ग, देवगड, सावंतवाडी या बस डेपोंचे तसेच आंबोली व शिरोडा या बसस्थानकातील प्रतिनिधिंनी यावेळी उपस्थित राहून व्हिलचेअर स्वीकाराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!